Download App

महाकुंभात चक्क ‘आयआयटीयन बाबा’: अध्यात्मासाठी सोडलं विज्ञान…

IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. मात्र यावेळी कुंभमेळ्यात ‘आयआयटीयन बाबा’ची उपस्थिती सोशल मीडियावर चर्चेचा (Mahakumbh 2025) विषय बनली आहे. त्यांच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया 

कुंभमेळ्यातील अनेक साधूंनी जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलंय. कोणी डोक्यावर रुद्राक्ष धारण केलेत. तर काहीजण जेवलेलेच नाहीत. यात आणखी एका अशाच खास साधूची भर पडली आहे. ते आहेत आयआयटीयन बाबा. हरियाणातील रहिवासी असलेल्या ‘आयआयटीयन बाबा’चे खरे नाव अभय सिंह आहे. ते आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहेत. आता सध्या ते अध्यात्माच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे सध्या ते मसानी गोरख बाबा म्हणून ओळखले जातात.

आयआयटीयन बाबा काय म्हणतात?

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ‘आयआयटीयन बाबा’ यांनी आपल्या प्रवासाबद्दल खुलासा केलाय. त्यांनी केवळ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले नाही तर तत्त्वज्ञान, पोस्टमॉर्टेमिझम आणि सॉक्रेटिस-प्लेटोसारख्या विचारवंतांचा देखील सखोल अभ्यास केला. विज्ञान सोडून अध्यात्माकडे वाटचाल करण्याच्या प्रश्नावर आयआयटीयन बाबा म्हणाले की, ही सर्वोत्तम अवस्था आहे. अभियांत्रिकी आणि डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. जीवनाचे मूल्य केवळ भौतिक सुखच नाही, तर ज्ञान आणि शांतीचा शोध असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप

आयआयटीयन बाबाची कहाणी महाकुंभमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना केवळ प्रेरणा देत नाही, तर सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. अद्वितीय व्यक्तिमत्त्व असलेले लोक महाकुंभात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाकुंभाचे महत्त्व आणखीनच वाढलंय. 13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आज महाकुंभाचा दुसरा दिवस आहे.

follow us