Kripa Shankar Singh : महाराष्ट्रात गृहराज्यमंत्री राहिलेल्या कृपाशंकर सिंग यांचा जौनपूर लोकसभा निवडणुकीत (Jaunpur Lok Sabha constituency) मोठा मताधिक्याने पराभव झाला. सपाचे बाबू सिंह कुशवाह यांनी कृपाशंकर सिंग (Kripa Shankar Singh)यांचा 99 हजार 335 मतांनी पराभव केला.
भलतंच, राहुल गांधींनी पराभव केला; मंत्री म्हणतात एक वर्ष लोकांची कामच करणार नाही
जौनपूरमध्ये भाजप आणि सपा यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत सुरुवातीला भाजपचे कृपाशंकर सिंग आघाडीवर होते. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये सपाचे बाबू सिंह कुशवाह आघाडीवर राहिले होते. अखेर बाबू सिंह कुशवाह यांनी मोठ्या मताधिक्याने कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला आहे. या विजयासह ते पहिल्यांदाच लोकसभेचे खासदार झाले आहेत. बाबू सिंह कुशवाह यांना 5,09,130 मते मिळाली असून त्यांनी 99 हजार 335 मतांनी कृपाशंकर सिंग यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंग त्यांना 4,09,795 मते मिळाली.
चुकीच्या आहारामुळे भारतीयांना असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलं; ICMR-NIN ने जारी केला डाएट प्लॅन
तिसऱ्या क्रमांवर राहिलेले बहुजन समाज पार्टीचे श्याम सिंह यादव यांना 1,57,137 मते मिळाली. तर समाज विकास क्रांती पार्टीच्या अशोक सिंग यांना अवघी 2,755 मते मिळाली.
बाबू सिंह कुशवाह यांची कारकीर्द
बाबू सिंह कुशवाह यांचा जन्म 7 मे 1966 रोजी झाला आणि ते राज्यातील बांदा जिल्ह्यातील पाखरौली येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील भागवत प्रसाद हे एक सामान्य शेतकरी होते. ते 2016 मध्ये स्थापन झालेल्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख आहेत आणि मायावती यांच्या बसपा सरकारमध्ये कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री राहिले आहेत.
यूपीत एनडीएला केवळ 36
देशातील 18 व्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया संपली असून अनेक राज्यात भाजपची चांगलीच पिछेहाट झाली. युपीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीने 80 पैकी 43 जागा जिंकल्या. तर एनडीएला केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले. सपाने राज्यातील जौनपूर लोकसभा जागाही ताब्यात घेतली आहे.
पहिले खासदार बिरबल सिंग
जौनपूर लोकसभा मतदारसंघात बादलपूर, शाहगंज, जौनपूर, मल्हानी आणि मुंगरा बादशाहपूर या 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 साली या लोकसभा मतदारसंघातून बसपचे श्याम सिंह यादव विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे कृष्ण प्रताप सिंह के.पी. त्यांचा 80936 मतांनी पराभव केला होता.