Inauguration of New Parliament : देशाच्या संसदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहुर्त अखेर ठरला आहे. येत्या 28 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.
Prime Minister Narendra Modi to inaugurate new Parliament building on May 28: Lok Sabha Speaker Om Birla
— Press Trust of India (@PTI_News) May 18, 2023
येत्या 30 मे ला पंतप्रधान मोदींच्या सरकारला 9 वर्ष पुर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर मोठ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. त्या दरम्यान आता येत्या 28 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.
ठाकरे गटाच्याच नेत्याची सुषमा अंधारेंना मारहाण, बीडमधील धक्कादायक प्रकार
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी स्वतः या नव्या संसद भवनाच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळीच या इमारतीचे काही फोटो समोर आले होते. त्यावेळीच या इमारतीची खासियत देखील सांगण्यात आली होती. सध्या या इमारतीच्या बांधकामाला वेग आला आहे. त्यातच आता उद्घाटनाची तारिख देखील निश्चित झाली आहे.
काय आहे या इमारती वैशिष्ट्ये?
1 संसदेच्या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार आहेत.
2 लोकसभेचे 1 हजार तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था
3 सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असतील
4 या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल
5 याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.