Download App

करदात्यांसाठी मोठी बातमी! परदेशात जाण्यासाठी आयकर विभागाचं ‘हे’ प्रमाणपत्र असणार बंधकारक

करदात्यांसाठी एक नियम घालून देण्यात आला आहे. त्यानुसार करदात्यांना परदेशात जाण्याअगोदर Income tax clearance घेणे अनिवार्य असणार आहे.

Income tax clearance mandatory to leave India : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी एक नियम घालून देण्यात आला आहे. त्यानुसार आता करदात्यांना परदेशात (leave India) जाण्याअगोदर आयकर विभागाकडून मंजुरी म्हणून टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट (Income tax clearance) घेणे अनिवार्य असणार आहे.

शरद पवार गटाकडून अजित पवारांना पुन्हा धक्का, बाबाजानी दुर्रानींनंतर दुसरा आमदार गळाला?

या संदर्भात आयकर विभागाने एक नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, करदात्यांना देश सोडण्या अगोदर आयकर विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र हे केवळ विशेष परिस्थितीमध्येच लागू होणार आहे. परदेशात जाण्यासाठी टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट त्याच करदात्यांनाअनिवार्य असणार आहे. ज्यांच्यावर गंभीर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आहेत.

मोठी बातमी! पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त निलंबित

त्याचबरोबर ज्यांच्यावर दहा लाखांहून अधिक प्रत्यक्ष कर थकबाकी आहे. तसेच हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. त्यानंतर मुख्य आयकर आयुक्त त्यांच्याकडून हे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचा कर किंवा काळा पैसा नसल्याचं मानलं जाईल.

दरम्यान केंद्र सरकारच्या नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी करदात्यांना या अगोदर बंधनकारक असलेल्या गोष्टींमध्ये काळ्या पैशाचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे परदेशात जाण्यासाठी व इतर कारणांसाठी टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवणाऱ्या करदात्यांना त्यांच्याकडील काळ्या पैशाची देखील माहिती द्यावी लागणार आहे.

follow us

संबंधित बातम्या