Download App

सावधान! फेसबूक, ईमेल अन् कॉम्प्यूटर.. आयकर विभाग सगळंच तपासणार, पण का?

1 एप्रिलपासून आयकर विभागाकडे सोशल मिडिया अकाउंट, ईमेल, बँक अकाउंट्स, ऑनलाइन इव्हेस्टमेंट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट तपासण्याचा अधिकार असेल.

Income Tax Rules : ऐकलं का अन् वाचलं का.. नुकतीच एक बातमी आली आहे. जी खरंतर सगळ्यांनाच शॉक देणारी आहे. तुम्ही फेसबूक, ईमेल आणि अन्य सोशल मिडिया अकाउंट्सचा वापर करत असाल. पण कर भरत नसाल. मग तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच कामाची आहे. आयकर विभाग तुमचे सोशल मिडिया अकाउंट्सपासून थेट पर्सनल ई मेल, बँक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट चेक करू शकतो. हा नेमका काय प्रकार आहे? असा कोणता नवा नियम आला आहे? सोशल मिडिया अकाउंट चेक करण्याची गरज आयकर विभागाला का वाटली? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ यात..

आयकर विभाग आता तुमचे पर्सनल ईमेल, सोशल मिडिया अकाउंट्स चेक करू शकतो. 1 एप्रिलपासून आयकर विभागाकडे सोशल मिडिया अकाउंट, ईमेल, बँक अकाउंट्स, ऑनलाइन इव्हेस्टमेंट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट तपासण्याचा अधिकार असेल. घाबरू नका. हा नियम सगळ्यांसाठी नाही. कुणी जर करचोरी करत आहे असा संशय आयकर अधिकाऱ्यांना वाटू लागला आणि याचे ठोस कारण त्यांच्याकडे असेल तरच त्या व्यक्तीचे खाते तपासले जाऊ शकेल.

म्हणजेच जर एखाद्या करदात्याकडे अघोषित उत्पन्न, संपत्ती अथवा कागदपत्रे असतील आणि या गोष्टी जाणूनबुजून आयकर विभागापासून लपवल्या जात असतील आणि अशी पक्की माहिती आयकर विभागाकडे असेल तर अशा परिस्थितीतच हा नवा नियम लागू होईल. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांना अशा करचुकवेगिरी करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा अधिकार राहील.

आता आयकर विभाग तपासू शकणार तुमची ट्रेडिंग अकाऊंट्स; वाचा, काय आहेत नव्या तरतुदीत नियम?

नव्या नियमांत नेमकं काय

सध्याच्या स्थितीत आयकर अधिनियम 1961 च्या 132 कलमानुसार अधिकाऱ्यांना झडती घेणे आणि संपत्ती तसेच हिशोबाची कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार आहे. नव्या आयकर विधेयकात हा अधिकार कम्प्यूटर सिस्टीम अथवा व्हर्चुअल डिजिटल स्पेसपर्यंत वाढवण्यात आला आहे. आयकर विभागाच्या 247 क्ल़ॉजनुसार जर एखाद्या व्यक्तीकडे अघोषित संपत्ती आहे जी आयटी अधिनियमांत येते अशी खात्री असेल तर अधिकारी कोणताही बॉक्स, लॉकर, तिजोरी, कपाट किंवा अन्य वस्तूंचे कुलूप तोडू शकतात. कोणत्याही घरात प्रवेश करू शकतात आणि त्या घराची तपासणी करू शकतात.

व्हर्चुअल डिजिटल स्पेस म्हणजे काय

आयकर विधेयकात सांगितल्यानुसार व्हर्चुअल डिजिटल स्पेसची व्याख्या अतिशय व्यापक आहे. एखाद्या व्यक्तीचे सोशल मिडिया अकाउंट, बँक खाते, ट्रेडिंग अकाउंट आणि ईमेल व्हर्चुअल डिजिटल स्पेस अंतर्गत येतात. खरंतर या आभासी मालमत्ता आहेत. परंतु, एखादा करदाता जर कर भरत नसेल तर त्याच्या या मालमत्ता देखील आता आयकर विभागाच्या रडावर आल्या आहेत. तेव्हा सावध व्हा, उत्पन्न मिळवताय तर तसाच करही भरत चला…

सावधान! जंक फूडचा मेंदूला गंभीर धोका, ‘या’ समस्या निर्माण होण्याची शक्यता

follow us