मनीष सिसोदियांना धक्का: सीबीआय कोठडीत वाढ

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या सीबीआय (CBI) कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज त्यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या सीबीआय (CBI) कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

आज त्यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांना पुन्हा दोन दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.

“रवीभाऊ आपले अभिनंदन, पण देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे…” रासणेंचा धंगेकरांना टोला

राऊस एव्हेन्यू कोर्टात ज्येष्ठ वकील मोहाती माथूर म्हणाले की, सिसोदिया यांच्या पत्नी अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना आणखी कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही. तपासात सहकार्य न केल्याने रिमांड कसा मागता येईल, या आधारावर एजन्सीने पुन्हा 3 दिवसांत जामीन मागितला तर काय होईल, हे असेच सुरू राहणार का?

10 मार्च रोजी जामीन अर्जावर सुनावणी
विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी सीबीआयला नोटीस बजावली आणि उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

त्यावर 10 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. सुनावणीदरम्यान, सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मोहित माथूर यांनी जामीन याचिकेवर सुनावणी करण्याबाबत सांगितले. यावर सीबीआयतर्फे हजर झालेले विशेष सरकारी वकील पंकज गुप्ता म्हणाले की, एजन्सीला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ हवा आहे. होळीनंतर या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले.

Exit mobile version