“रवीभाऊ आपले अभिनंदन, पण देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे…” रासणेंचा धंगेकरांना टोला

  • Written By: Published:
“रवीभाऊ आपले अभिनंदन, पण देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे…” रासणेंचा धंगेकरांना टोला

“रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन पण देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत.” अशी टीका कसबा पोटनिवडणुकीत पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केली आहे. कसबा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यांनतर रवींद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. “भविष्यात देवेंद्र फडणवीस भाजपला रसातळाला नेतील, असं म्हणत सत्ता गेल्यावर फडणवीसांना नमस्कार करणारं कुणीही नसेल,” अशी टीका रवींद्र धंगेकरांनी केली होती

रवींद्र धंगेकर यांच्या याच टीकेला हेमंत रासने यांनी उत्तर दिले आहे. रासने यांनी आपल्या सोशल मीडियावरून धंगेकर यांना उत्तर दिले आहे. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत. असा म्हणत रासने यांनी निवडणूक संपली तरीही आपला राजकीय विरोध कायम ठेवला आहे.

हेही वाचा : पोस्टर वॉर! कसबा एक झाकी है, कोथरूड नागपूर बाकी है…

नक्की काय म्हणले आहे ट्विटमध्ये?

हेमंत रासने यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन ! आपण मा. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. मा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत.”

हेमंत रासने यांनी केलेल्या या टीकेला रवींद्र धंगेकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचं आहे. पण यामुळे निवडणूक संपली तरी पुढच्या काळात धंगेकर विरुद्ध रासने या संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube