Air Pollution in India : भारतात वायू प्रदूषणाची समस्या (Air Pollution) अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे त्यामुळे प्रदूषणही प्रचंड वाढले आहे. थंडीच्या दिवसांत तर हवेची गुणवत्ता अधिक खराब होत आहे. तर काही शहरांत तर वर्षभर हवेची गुणवत्ता खराब (Air Quality Index) राहत आहे. याचा आरोग्यावरही अतिशय गंभीर परीणाम होत आहे. प्रदूषण अनेक आजारांना कारणीभूत आहे. अनेक शहरांची एअर क्वालिटी अत्यंत खराब श्रेणीत पोहोचते. त्यामुळे श्वास घेणे सुद्धा कठीण होऊन जाते. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसांत (Winter Season) भारतात वायू प्रदूषण सर्वात आव्हानात्मक स्थितीत (Pollution in India) पोहोचलेले असते.
Winter Ambient Air Quality Snapshot for india 2025 अहवालानुसार ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या काळात देशातील अनेक शहरांमध्ये एअर क्वालिटी धोकादायक पातळीवर पोहोचली होती. या अहवालाच्या आधारे देशातील दहा सर्वाधिक प्रदूषित दिवस आणि शहरांची माहिती घेऊ या..
ज्या दिवसांत वायू गुणवत्ता सूचकांक (AQI) आणि PM 2.5 सर्वोच्च पातळीवर होता त्या दिवसांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या दिवसांमध्ये दिल्ली, बर्निहाट, हाजीपूर, गाझियाबाद, गुरुग्राम, नोएडा, पाटणा, आसनसोल, दुर्गापूर आणि चरखी दादरी शहरांत तर श्वास घेणे सुद्धा कठीण झाले होते.
काय तु्म्ही सुद्धा 6 तासांपेक्षा जास्त वेळ बसून काम करता? मग, ‘या’ आजारांचा नक्कीच धोका
रिपोर्टनुसार देशाची राजधानी दिल्ली या काळात (Pollution in Delhi) सर्वाधिक प्रदूषित शहर राहिले. येथे पीएम 2.5 ची पातळी खूप जास्त होती. 74 दिवसांत हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत राहिली. यामुळे दिल्लीकरांना श्वास घेणे सुद्धा कठीण झाले होते.
सर्वाधिक प्रदूषित दिवस
5 जानेवारी दिल्ली
पीएम पातळी 250+
10 डिसेंबर बर्नीहाट
पीएम पातळी 240
15 जानेवारी 2025 हाजीपूर
पीएम पातळी 230
20 डिसेंबर 2024 गाझियाबाद
पीएम पातळी 225
25 जानेवारी 2025 गुरुग्राम
पीएम पातळी 220
30 नोव्हेंबर 2024 नोएडा
पीएम पातळी 215
12 जानेवारी 2025 पटना
पीएम पातळी 210
8 डिसेंबर 2024 आसनसोल
पीएम पातळी 205
18 जानेवारी 2025 दुर्गापूर
पीएम पातळी 200
22 डिसेंबर 2024 चरखी दादरी
पीएम पातळी 195
थंडीच्या दिवसांत हवा स्थिर होते. यामुळे प्रदुषक तत्व वातावरणात दीर्घ काळ टिकून राहतात. तसेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात ऊसाचे पाचट जाळले जाते. यामुळे थंडीच्या दिवसांत प्रदूषण कमालीचे वाढलेले असते. दिल्ली एनसीआर सहित अनेक शहरांत वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब होत आहे. दिल्लीत कन्स्ट्रक्शन आणि इंडस्ट्रीयल इमिशनमुळे वायू प्रदूषण अधिक गंभीर बनले आहे. ग्रामीण भागात थंडीपासून वाचण्यासाठी लाकडे आणि कोळसा जाळला जातो यामुळे देखील प्रदूषणात वाढ होत आहे.
प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी पिताय सावध व्हा; ‘या’ तीन गंभीर आजाराचा धोका ओळखा
दीर्घ काळ प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने फुफ्फुस आणि हृदय विकारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांत दमा आणि ब्रोंकाइटिस सारख्या आजारांचा धोका वाढतो. पीएम 2.5 कण शरीरात प्रवेश करून ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि स्ट्रोक यांना कारणीभूत ठरतात.