Download App

‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाचे ठराव, ‘लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार’

INDIA Alliance meeting : मुंबईतील इंडिया(INDIA)आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यांनी इंडिया आघाडीचा ठराव वाचून दाखवला.

इंडिया गाडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
– इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार
– लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेऊन त्यांची घोषणा केली जाणार
– गिव्ह अँड टेक पॉलिसीवर इंडिया आघाडी काम करेल
– सामाजिक प्रश्न आर्थिक विकास यांसह विविध धोरणांवर ही आघाडी काम करेल
– लवकरच देशभरात इंडिया आघाडीच्या रॅली आयोजित केल्या जाणार
– देशातील सर्व भाषांमध्ये ‘जोडेगा भारत, जितेगा इंडिया’ या घोषवाक्यांसह इतरही घोषणा आणि स्लोगन प्रसारित केली जाणार

मोदी सरकार हे सर्वात अहंकारी सरकार असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. हे सरकार फक्त एका माणसाला वाचवण्यात व्यस्त आहे. देशात असे अहंकारी सरकार कधीच नव्हते. आम्ही पदासाठी नाही तर भारताला वाचवण्यासाठी पुढे आलो आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

मोदींना वाराणसीतून निवडून येण्याचा विश्वास नाही, सुषमा आंधारेंचा हल्लाबोल

नितीशकुमार म्हणाले की, आता जे केंद्रात आहेत ते नक्की जातील. कोणतेही विकासाचे काम करत नाही, फक्त बढाई मारत आहे. आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही. ते इतिहास बदलण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी होऊ शकतात.

One Nation One Election ला अजितदादांची साथ; विरोधकांनाही दिला इशारा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मणिपूरसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले नाही. मणिपूर जळत होते तेव्हा विशेष अधिवेशन का बोलावले नाही? चीनच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन का बोलावले नाही? घटनात्मक संस्था उद्ध्वस्त होत आहेत. ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे, अशी टीका खर्गे यांनी केली.

Tags

follow us