One Nation One Election ला अजितदादांची साथ; विरोधकांनाही दिला इशारा

One Nation One Election ला अजितदादांची साथ; विरोधकांनाही दिला इशारा

One Nation One Election : देशात एक देश एक निवडणूक (One nation One Election) घेण्यासाठी मोदी सरकारने समिती गठीत केली आहे. देशात बऱ्याच दिवसांपासून याची चर्चा होतीच. निवडणुकीतील वेळ आणि पैशांचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने देशभरात एकाच वेळी निवडणुका घेता येतील का याची चाचपणी सरकारकडूनही केली जात होती. अखेर आज मोदी सरकारने त्या दिशेने पावले टाकली असून समिती गठीत करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकारच्या या धोरणाला पाठिंबा दिला आहे.

अजित पवार यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं मांडलेली वन नेशन वन इलेक्शन (One Nation One Election) भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्याने कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विकास खुंटतो. वन नेशन वन इलेक्शन मुळे एकाच वेळी निवडणुका होतील आणि उर्वरितच वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.

पंतप्रधानांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं पुढाकार घेतलेल्या वन नेशन वन इलेक्शन (One Nation One Election) भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकतेनं पहावं. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

One Nation, One Election अंतर्गत देशात चार निवडणुका; 2018 मध्ये ‘लॉ कमिशन’च्या सूचना काय?

काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु, त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. यापूर्वी वन नेशन, वन टॅक्स हा निर्णय मोदीजी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अमलात आणला आणि यशस्वी करून दाखवला. त्याच धर्तीवर वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो, असे अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘वन नेशन वन इलेक्शन’ च्या (One Nation One Election) चर्चामध्ये आता दावे प्रतिदावे केले जात असून, वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत देशात यापूर्वी चारवेळा निवडणुका झाल्या आहेत . स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकाही याच पद्धतीने झाल्या होत्या. यानंतर 1957, 1962 आणि 1967 मध्येही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या. मात्र, अनेक राज्यांतील सरकारे पडू लागल्याने आणि विधानसभा बरखास्त करावी लागल्याने एकाचवेळी निवडणुका घेण्याची ही व्यवस्था ठप्प पडली आणि राज्यांच्या निवडणुका वेगळ्या होऊ लागल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube