श्रुती वाकडकर यांनी रचला इतिहास; प्रभाग क्रमांक 25 मधून प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी दणदणीत विजय मिळवत नवीन अध्याय रचला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (280)

Shruti Wakadkar wins from Ward No. 25 with a huge margin of votes : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी दणदणीत विजय मिळवत नवीन अध्याय रचला आहे. आजवरच्या इतिहासात वाकडच्या प्रतिष्ठित वाकडकर कुटंबियांना त्यांच्या रुपाने प्रथमच प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. वाकडकर घराण्यातील पहिल्या-वहिल्या नगरसेविका म्हणून श्रुती वाकडकर सभागृहात जाणार असल्याने वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात विजयोत्सव सुरु आहे. राहुल कलाटे यांच्या नेतृत्वात श्रुती राम वाकडकर, रेश्मा चेतन भुजबळ, कुणाल वाव्हळकर ह्या पॅनलच्या विजयामुळे ठिकठिकाणी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या “हा विजय माझा वैयक्तिक नसून प्रभाग क्रमांक 25 मधील प्रत्येक मतदाराचा आहे. दिलेल्या विश्वासाला न्याय देत प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” या निकालामुळे प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपाची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात या परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल.

कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल

श्रुती वाकडकर यांनी क गटातून मुळशीचे माजी सभापती रमण पवार व माजी नगरसेविका यमुना पवार यांच्या स्नुषा तसेच उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार चित्रा संदीप पवार यांचा तब्बल 11023 मतांनी दणदणीत पराभव केला. त्यांना 21837 इतकी भरघोस मते मिळाली. श्रुती वाकडकर यांनी प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्नांवर केंद्रित, सकारात्मक व विकासाभिमुख अजेंडा मांडत मतदारांशी थेट संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला-सशक्तीकरण, युवकांसाठी क्रीडांगणे व उद्याने, तसेच मूलभूत नागरी सुविधांचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते. त्यामुळे त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या विजयामागे आमदार शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे पॅनल प्रमुख राहुल कलाटे, भाजपा वरिष्ठ शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन, तसेच भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, घराघरात पोहोचलेला प्रचार आणि संघटित ताकद महत्त्वाची ठरली. विशेषतः महिला मतदारांचा मोठा पाठिंबा सौ. वाकडकर यांना मिळाल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान या पॅनलने दिलेल्या वचननाम्याची पूर्तता नक्की होईल अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

follow us