Sniper Rifle : भारताने पहिल्यांदाच मोठी कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत दुसऱ्या देशांकडून विविध (Sniper Rifle) शस्त्रास्त्रे खरेदी केली पण आता प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. भारत पहिल्यांदाच स्नायपर या रायफल्सचा निर्यातदार देश बनला आहे. बंगळुरूतील (Bengaluru) एका कंपनीला एका मित्र देशाकडून रायफल्सचा पुरवठा करण्याचा करार मिळाला आहे. लहान शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या एसएसस डिफेंस या कंपनीला .338 लापुआ मॅग्नम कॅलिबर स्नायपर रायफल्सचा पुरवठा करण्याची ऑर्डर भारताच्या एका मित्र देशाकडून मिळाली आहे. कंपनीने ही ऑर्डर पूर्ण केल्याचीही माहिती आहे.
फक्त रायफल्सच नाही तर या कंपनीला अन्य देशांकडून जवळपास 50 मिलियन डॉलर किंमतीच्या दारुगोळा पुरवठा करण्याबाबत ऑर्डर मिळाल्याची माहिती आहे. स्नायपर रायफल 1500 मीटर आणि त्यापेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याला टिपण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही रायफल पूर्णपणे भारतात डिझाईन आणि तयार करण्यात आलेली आहे.
संरक्षण बजेटमध्ये वाढ, हत्यारं अन् दारुगोळा खरेदीसाठी 548 अब्ज; पाकिस्तानचा प्लॅन काय?
संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने द प्रिंटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की पहिल्यांदाच भारताने एखाद्या दुसऱ्या देशाला रायफल निर्यात केल्या आहेत. एसएसएस डिफेन्सने आधीच रायफल निर्यात पूर्ण केली असून आणखी काही देशांबरोबर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
या देशांच्या प्रतिनिधी मंडळाने कंपनीत येऊन येथील विविध युनिट्सची पाहणी केली आहे. यानंतर व्यवहार कशा पद्धतीने करायचा यावर चर्चा सुरू आहे. भारत आता मोठ्या प्रमाणात उपकरणांची निर्मिती आणि निर्यात करत आहे. यामध्ये मोठमोठ्या तोफा, मिसाइल सिस्टीम आणि लहान हत्यारांचा समावेश आहे. भारत आधी या उपकरणांची आयात करत होता. पण आता काळ बदलला आहे. भारताने मोठ्या मेहनतीने प्रगती केली आणि आता अशी परिस्थिती आहे की या सगळ्या साहित्याची निर्यात देशातून होऊ लागली आहे.
भविष्यात या रायफल्सच्या निर्यातीला मोठा वाव राहणार आहे. कारण कमीत कमी 30 देश असे आहेत जे .338 लापुआ मॅग्नम स्नायपर रारफल्सचा वापर करतात. या व्यतिरिक्त बारा पेक्षा जास्त निर्माता कंपन्या या कॅलिबरमध्ये अनेक कॉन्फिगरेशनसह रायफल्स तयार करतात.
Khalistan News: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने थेट अमित शहा आणि एस जयशंकर यांना दिली धमकी