बंगळुरूतील १५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, डी.के. शिवकुमार म्हणाले, ‘माझ्या घरासमोरील शाळेलाही…’
Bengaluru School Bomb Threat : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील किमान 15 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) देण्यात आली. ही धमकी शाळांना ईमेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांत भीतीचं वातावरणण पसरलं. या धमकी मिळाल्यानंतर 5000 मुलांना तातडीने शाळेतून बाहेर काढण्यात आले. सध्या बंगळुरू पोलीस (Bangalore Police) आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून बॉम्बचा शोध घेत आहेत.
Mouni Roy : मौनी रॉयच्या शॉर्ट गुलाबी फ्रॉकमधील मादक अदा
बंगळुरूमधील 15 खाजगी शाळांना बॉम्बस्फोट करण्याची धमकी 1 डिसेंबर रोजी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. सर्व शाळांना एकाच वेळी ई-मेल मिळाल्याने शाळा प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवले. यापैकी एक शाळा कर्नाटकचे डीसीएम डीके शिवकुमार यांच्या निवासस्थानासमोरर आहे.
२४ तासांत पकडू – डीके शिवकुमार
डीके शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, मी टीव्ही बघत होतो. माझ्या घरासमोरील शाळेलाही धमकीचा मेला आला होता. मी इथे चौकशी करण्यासाठी आलो आहे. त्यानंतर पोलिसांनी मला ईमेल दाखवला. हा मेल बनावट दिसतो. काही भंपक घटकांनी हे कृत्य केले असावे. आम्ही त्यांना २४ तासांत पकडू. सायबर क्राइम पोलिस सक्रिय असून, आपले काम करत आहेत. मी पोलिसांशी बोललो, पण आपण काळजी घेतली पाहिजे.
बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळताच बॉम्बपथक आणि पोलिस घडनास्थळी दाखल झाले. ज्या शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या आल्या, त्या सर्व शाळांत बॉम्ब निकामी करण्याची पथके पाठवण्यात आली. ज्या शाळांना ही धमकी मिळाली आहे त्यात व्हाईटफिल्ड, कोरमंगला, बसवेशनगर, यालहंका आणि सदाशिवनगर येथील शाळांचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आहे. पोलिसांकडून बॉम्बचा तपास घेतला असता अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
घाबरण्याची गरज नाही
बंगळुरूमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘पोलीस तपास करतील आणि मी त्यांना तसे करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शाळांची तपासणी करून सुरक्षा वाढवण्याच्या मी सुचना पोलिसांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी सांगितले की, आम्ही ईमेलचा स्रोत पडताळत आहोत. आम्ही ते गांभीर्याने घेत आहोत. प्राधान्याने तपास करण्यासाठी मी पोलिसांना कळवले आहे.
पोलिसांकडून शोधमोहित सुरू आहे. मात्र पोलिसांना अद्याप काहीही सापडलेले नाही. दरम्यान, हा बनावट ईमेल आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या वर्षी, 19 जुलै 2022 रोजी बंगळुरूमध्येही 30 शाळांना अशीच धमकी देण्यात आली होती. 8 एप्रिल 2022 रोजी 6 शाळांना धमकीचे संदेश पाठवण्यात आले होते. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होसूर रोडवरील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता नोकरीवरून बडतर्फ केलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने संतप्त होऊन ही धमकी दिली होती.