India ChatGPT : आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट्स चॅटजीपीटी आणि बार्ड जोरात सुरू आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्या टीकेनंतर भारत स्वतःचा चॅटबॉट (Chatbot) आणणार आहे, अशी माहिती दिली जात आहे. एका अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, काही काळ थांबा, लवकरच मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. भारताच्या आयटी मंत्री अश्विनी वैष्णव अलीकडेच ताज पॅलेस हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
अश्विनी वैष्णव यांनी म्हणाले की, आज अशी वेळ आली आहे की जगभरातील सर्व मोठ्या टेक डेव्हलपर्सना भारतीय स्टार्टअपने त्यांच्यासोबत भागीदारीत काम करावे लागणार आहे. जगातील आर्थिक मंदी आणि सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे, या संकटाच्या काळातही आम्ही भारतीय स्टार्टअप्सना वाचवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अश्विनी वैष्णव यांना जेव्हा ChatGPT सारख्या AI प्रणालींबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘काही आठवडे थांबा. मोठी घोषणा केली जाईल. इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलताना ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज भारताची ओळख समृद्ध देश म्हणून होत असल्याचेही ते म्हणाले. भविष्याचा रोडमॅप सादर करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘आता आम्ही 6G दूरसंचार सेवांवर काम करत आहोत. आम्ही 4G आणि 5G च्या बाबतीत जगाशी स्पर्धा केली. आता आपण 6G तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नेतृत्वाच्या भूमिकेत दिसणार आहोत. भारताला 6G टेलिकॉम तंत्रज्ञानाचे 127 पेटंट मिळाले आहेत.