Budget 2025 : लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी 2025 साठी तब्बल 50.65 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत टॅक्समध्ये मोठी सवलत दिली आहे. तर दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे का? भारताचा बजेट पाकिस्तानपेक्षा अंदाजे 11 पट जास्त आहे.
पाकिस्तान सरकार दरवर्षी जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करत असते. पाकिस्तान (Pakistan) सरकारने जून 2024 मध्ये शेवटाचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) 2024 साठी 14460 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. भारतीय चलनात ही रक्कम 4.5 लाख कोटी रुपये इतकी आहे.
शनिवारी सादर करण्यात केलेल्या बजेटचा आकारही पाकिस्तानी अर्थसंकल्पापेक्षा 11 पट जास्त आहे. भारतीय अर्थसंकल्पात प्रामुख्याने पायाभूत सुविधा, शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रांसाठी जास्त खर्च करण्यात येतो तर दुसरीकडे पाकिस्तानने सादर केलेल्या शेवटच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 1.8 ट्रिलियन रुपये, आरोग्य सेवांसाठी 0.2 ट्रिलियन रुपये, शिक्षणासाठी 0.88 ट्रिलियन रुपये आणि शेती आणि ग्रामीण विकासासाठी 0.55 ट्रिलियन रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती.
दोन्ही देशांच्या बजेटमधील फरक माहितीनुसार, भारताची अर्थव्यवस्था सध्या 3.7 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे तर पाकिस्तानचा जीडीपी अंदाजे $375 अब्ज आहे. तसेच भारताचे कर संकलन देखील पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.
2 घरांचे मालक असाल तर तुम्हालाही मिळणार ‘गुड न्यूज’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
तर पाकिस्तानचे संरक्षण क्षेत्रावर भारताइतकेच बजेट आहे. याशिवाय भारताता शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर पाकिस्तानपेक्षा जास्त अनेक पटीने जास्त खर्च करण्यात येतो.