2 घरांचे मालक असाल तर तुम्हालाही मिळणार ‘गुड न्यूज’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

  • Written By: Published:
2 घरांचे मालक असाल तर तुम्हालाही मिळणार ‘गुड न्यूज’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प सादर (Budget 2025) केले आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी घोषणांचा पाऊस केला आहे. तसेच सर्वसामान्यांना दिलासा देत टॅक्समध्ये मोठी कपात केली आहे.

तसेच या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी घराच्या मालकीच्या हक्कांशी संबंधित देखील मोठी घोषणा केली आहे. ज्याच्या थेट फायदा आता करदात्यांना होणार आहे. करदाते कोणत्याही अटीशिवाय दोन स्वतःच्या ताब्यातील मालमत्तेचे वार्षिक मूल्य शून्य म्हणून घोषित करू शकतात. अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी आज केली आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सध्या, काही अटी पूर्ण झाल्यासच करदाते स्वतःच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेसाठी शून्य वार्षिक मूल्याचा दावा करू शकतात. करदात्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कोणत्याही अटीशिवाय अशा दोन स्व-व्यापित मालमत्तेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आहे.

नियमांमध्ये बदल करण्याचे प्रस्ताव

केंद्र सरकारने आयकर कायद्याच्या कलम 23 च्या उप-कलम (2) मध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यासाठी तयारी दाखवली आहे. कलम 23 च्या उप-कलम (2) निवासी मालमत्तेच्या वार्षिक मूल्याच्या निर्धारणाशी संबंधित आहे. कलमाच्या उप-कलम (2) मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, जर घराची मालमत्ता निवासस्थानाच्या उद्देशाने मालकाच्या ताब्यात असेल किंवा मालक त्याच्या नोकरी, व्यवसायमुळे इतर कोणत्याही ठिकाणी असेल आणि मालमत्ता प्रत्यक्षात ताब्यात नसेल तर मालमत्तेचे वार्षिक मूल्य शून्य मानले जाईल. तर अर्थसंकल्पात म्हटले आहे की, उप-कलम (4) मध्ये असे म्हटले आहे की उप-कलम (2) च्या तरतुदी फक्त दोन घरांच्या मालमत्तेच्या बाबतीत लागू होणार.

नगर – सुपा MIDC मधील अतिक्रमण काढा, पालकमंत्री विखे पाटील ॲक्शन मोडमध्ये

भाड्यावरील टीडीएस मर्यादा वाढवली

तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी भाड्यावरील टीडीएसची वार्षिक मर्यादा सध्याच्या 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. भाड्यावरील टीडीएसची मर्यादा वार्षिक 2.40 लाख रुपयांवरून 6 लाख रुपयांपर्यंत वाढवली जात आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube