‘त्यांचं इंग्रजी चांगलं’… मी महापालिकेच्या शाळेत शिकलो ; खर्गेंनी निर्मला सीतारामन यांचा घेतला खरपूस समाचार
Congress Leader Mallikarjun Kharge Criticized Nirmala Sitharaman : लोकसभेत संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज देखील राज्यसभेत राज्यघटनेवर चर्चा होत आहे. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी (Mallikarjun Kharge) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची (Nirmala Sitharaman) खिल्ली उडवली. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर हल्ला केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचा खरपूस समाचार घेताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मला त्यांना सांगायचे आहे की मलाही वाचता येतं.
मी महापालिकेच्या शाळेत शिकलो. निर्मला सीतारामन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्याचं इंग्रजी चांगलं असेल, हिंदी चांगलं असेल हे निश्चित, पण त्यांची कृती चांगली नाही, असं मलिकार्जून खरगे (Rajya Sabha) म्हणाले आहेत.
Parbhani Violence : ‘भीमसैनिका’चा मृत्यू फडणवीस सरकार नियोजित, पटोलेंनी पुराव्यानिशी सांगितलं
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत सांगितले की, आता आम्हाला त्यांना सांगावे लागेल, की आम्हालाही थोडं फार वाचता येतं. आम्ही पालिकेच्या शाळेत शिकलो. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतलंय. निश्चितपणे त्यांचं इंग्रजी चांगलं असू शकतं, त्याचं हिंदीही चांगलं असू शकतं. सर्व काही चांगले असू शकते, परंतु त्यांची कृती चांगली नाही. अहमद फराज यांच्या ‘तुम खंजर क्यों लहराते हो…’ या शायरीने खर्गे यांनी सरकारवर निशाणा साधला.
पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली, पण…मुनगंटीवारांच्या शब्दाशब्दात खंत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, जे लोक राष्ट्रध्वजाचा तिरस्कार करतात, जे आमच्या ‘अशोक चक्राचा’ द्वेष करतात, जे संविधानाचा द्वेष करतात… असे लोक आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधान बनले, तेव्हा या लोकांनी ते जाळले. ज्या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, त्या दिवशी त्यांनी रामलीला मैदानावर (दिल्लीतील) बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचे दहन केले. भारतीय राज्यघटना मनुस्मृतीवर आधारित नसल्याने आरएसएसच्या नेत्यांनी त्याला विरोध केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाचा खर्गे यांनी पुनरुच्चार केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, ज्या प्रकारे लोकशाही प्रगती करतेय ती अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्या अंतरिम सरकारपासूनच त्यांनी राज्यघटनेतील तरतुदींबद्दल, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारपर्यंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कात्री चालवून आणि काँग्रेसचे सदस्य कामेश्वर सिंग यांचा उल्लेख करून काँग्रेसला कोंडीत पकडले. पंडित नेहरूंविरोधात कविता लिहिल्याबद्दल मजरूह सुलतानपुरी यांची झालेली अटक आणि बलराज साहनी यांच्या अटकेचा उल्लेख करून त्यांनी कॉंग्रेसलाही गोत्यात आणलं. गेल्या 75 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी संविधान आणि ‘किस्सा कुर्सी का’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरील बंदीबाबत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचाही उल्लेख केला. यावरून मलिकार्जून खरगे यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केलीय.