Download App

भारत-कॅनडा संघर्ष टोकाला, कॅनेडियन राजदूतांची भारतातून हकालपट्टी

Hardeep Singh Nijjar: कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एका उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी भारतानेही ‘ईंट का जवाब पत्थर से’ देत प्रत्युत्तर दिले आहे. काही तासांनंतरच कॅनडाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राजदूताला 5 दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना म्हटले होते की, ‘शीख नेते हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारतीय एजंन्टचा हात असू शकतो.’ एवढेच नाही तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही थेट भारतावर आरोप लावले. यानंतर भारताने एक निवेदन जारी करून कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. हत्येचा कॅनडाचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भारताने म्हटले आहे.

उच्चपदस्थांच्या हकालपट्टीवर भारताची प्रतिक्रिया?
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, भारताने नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन उच्चपदस्थाला देश सोडण्यास सांगण्याचा निर्णय घेतला आहे. उच्चपदस्थाला पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.

ऐतिहासिक! नव्या संसदेत कामकाजाचा ‘श्रीगणेशा’; पहिल्याच दिवशी येणार ‘महिला आरक्षण विधेयक’

कोण होता हरदीप सिंह निज्जर?
हरदीपसिंग निज्जर हा बंदी घातलेल्या फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित होते. गुरुपतवंत सिंग पन्नू यांच्यानंतर ते या गटाचा दुसरा नेता होता. या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर हा जालंधरच्या भारसिंग पुरा गावचा रहिवासी होता. 1996 मध्ये तो कॅनडाला गेला. त्याने कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केले. मात्र त्यानंतर तो खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाला.

अभिमानास्पद! UNESCO च्या जागतिक वारसा यादीत भारतातील 3 मंदिरांचा समावेश

निज्जरने कॅनडाचे नागरिकत्व स्विकारले होते. त्यामुळेच त्याच्या हत्येनंतर कॅनडातील काही शीख फुटीरतावादी संघटनांनी या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जरच्या हत्येबाबत संसदेतही सांगितले की, कॅनडाच्या नागरिकाची त्याच्या भूमीवर हत्या करणे हे सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही वर्षांत कॅनडा हे खलिस्तानी कारवायांचे केंद्र बनले आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी येथे लपले आहेत.

Tags

follow us