Download App

India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! कॅनडातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा महिंद्रांचा निर्णय

India Canada Row: खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Row) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्यानंतर कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत जम्मू काश्मीरसह पाकिस्तानीला हद्दीला लागून असलेली राज्ये आणि इशान्य भारतातील राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला, अशा पद्धतीने हा वाद चिघळत चालला असून त्याचा फटका व्यवसायालाही बसत आहे. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी : वाढत्या तणावात कॅनडाला भारताचा मोठा झटका; अनिश्चित काळासाठी व्हिसा बंदी

कंपनीने गुरुवारी सांगितले की त्यांची कॅनडा स्थित सब्सिडियरी कंपनी रेसन एयरोस्पेस कॉर्पोरेशनने काम थांबवले आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की रेसन कॉर्पोरेशनला कॅनडाकडून 20 सप्टेंबर 2023 रोजी कामकाज बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत. याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे. यानंतर रेसन कॉर्पोरेशनने कामकाज थांबवले आहे. या घडामोडींनंतर महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आणि 1584.85 रुपयांवर पोहोचले.

भारत-कॅनडा नेमका वाद काय?

कॅनडाच्या (Canada) नागरिकाच्या स्वतःच्या भूमीवर झालेल्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही देशाचा किंवा परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी कॅनडाचे नागरिक हरदीप सिंग निज्जर आणि भारत सरकार यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहेत. जी 20 शिखर परिषदेतही कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर अधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदी यांनी देखील कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली होती, असे ट्रुडो म्हणाले. खलिस्तानी अतिरेकी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता.

India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा

ट्रुडो यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले होते. तसेच कॅनडाच्या राजनयिकाला देश सोडण्याच्या सूचना दिल्या. अशा परिस्थितीत दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. कॅनडा सरकारने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. या वादावर आता भारत सरकारकडूनही जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. आताही भारत सरकारने कॅनडाला आणखी एक झटका देत कॅनडाच्या लोकांना भारताचा व्हिसा बंद केला आहे.

Tags

follow us