इतिहासातलं सर्वात मोठं पाऊल! भारताकडून 12 अण्वस्त्रे तैनात; ‘सिपरी’चा अहवाल

भारताने इतिहासात पहिल्यांदाच प्रत्यक्ष वापरासाठी अण्वस्त्रे तैनात केली असून 12 अण्वस्त्रे तैनात केल्याची माहिती सिपरीच्या अहवालातून समोर आलीयं.

weapons

weapons

Weapons Sipri Report : भारताने इतिहासात पहिल्यांदाच प्रत्यक्ष वापरासाठी अण्वस्त्रे तैनात केली आहे. आत्तापर्यंत भारताने 12 अण्वस्त्रे तैनात केली असून शस्त्रास्त्रे आणि शस्त्र नियंत्रण या विषयांवर काम करणारी स्वीडनच्या नामांकित संस्था ‘सिपरी’थिंक टँकने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तसेच चीननेदेखील तैनात अणुबॉम्बची संख्या वाढवलीयं. ही संख्या 26 वरुन आता थेट 34 केली असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.

मराठवाड्यात मान्सून लांबणीवर पडणार…, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

जगातील विविध देशांच्या अण्वस्त्र क्षमतांची माहिती स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सिपरी इयरबुक २०२६ मध्ये प्रसिद्ध केले आहे. भारताचा अण्वस्त्रांचा केवळ साठा केला नसून, त्यातील काही प्रत्यक्ष मोहिमेसाठी तैनात केली आहेत आणि असे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जगातील देश आता राष्ट्रीय शक्तीचे साधन म्हणून अणुबॉबवर पूर्वीपेक्षा अधिक अवलंबून राहू लागले आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. अण्वस्त्राचे दोन प्रकार असतात एक म्हणजे ​साठ्यातील अण्वस्त्रे आणि दुसरी म्हणजे तैनात अण्वस्त्रे.

गोदामात सुरक्षित ठेवलेली किंवा राखीव अण्वस्त्रांना साठ्यातील अण्वस्त्रं म्हटलं जातं. लष्कराच्या देखरेखीखाली असणारी ही अण्वस्त्र कोणत्याही क्षेपणास्त्रावर किंवा प्रक्षेपकावर बसवलेली नसतात. तात्काळ वापरासाठी नसली तरी गरज पडल्यास ती शस्त्रप्रणालीवर तैनात केली जाऊ शकतात. दुसरे म्हणजे आधीच युद्धनौका, विमाने किंवा क्षेपणास्त्रांवर बसवलेली ​तैनात अण्वस्त्रे. अगदी कमी वेळेत वापरण्यासाठी सज्ज ठेवली जातात. ​भारत आपली ही १२ तैनात अण्वस्त्रे ‘न्यूक्लियर ट्रायड’ तैनात केली आहेत.

शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुलाचा अर्ज बाद

दरम्यान, पाकिस्तानने अद्याप एकही अण्वस्त्र तैनात केलेले नाही. पण, चीनने २०२४ मध्ये २४ अण्वस्त्रे तैनात केली होती, त्याची संख्या वाढवून आता ३४ एवढी करण्यात आली आहे. याच अहवालानुसार, जानेवारी २०२६ पर्यंत जगात एकूण अंदाजे १२,१८७ अणुबॉम्ब अस्तित्वात होते. यापैकी जवळपास ९,७४५ अणुबॉम्ब संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. तैनात अणुबॉम्बच्या संख्येत रशिया जगातील सर्वात आघाडीचा देश असून त्यांच्याकडे १,७९६ अणुबॉम्ब तैनात आहेत.

Exit mobile version