India faces threat of 100% tariffs Donald Trump approved bill to increase economic pressure : अमेरिकन सिनेटने रशियावर आर्थिक दबाव वाढण्यासाठी एक असं विधेयक मंजूर केलं आहे. ज्यामुळे भारतावर देखील मोठं आर्थिक संकट येऊ शकतं.हे विधेयक सीनेटमध्ये मंजूर झालं तेव्हा त्याला 86 मतं मिळाली तर विरोधात केवळ 12 मतं होती. त्यानंतर अमेरिकन सरकारने हा कायदा केला तर भारतासह चीन, स्लोव्हाकिया, अजरबैजान आणि हंगेरी यांसारख्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लागने निश्चित होईल. मात्र अद्याप तो कायदा झालेला नाही.
Maharashtra Rain : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मुसळ’धार, दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी…
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने हे विधेयक रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी आणलं आहे. त्यातून रशियाची तेलविक्री आणि अंतिमत: रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर या टॅरिफचं संकट येणार आहे. ज्यामध्ये चीन आणि भारत या मोठ्या देशांचा समावेश आहे.
Maharashtra Rain : संपूर्ण महाराष्ट्रात ‘मुसळ’धार, दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी…
या विधेयकाचा हेतू असा आहे की, रशियाकडून इतर देशांनी तेल आणि गॅस खरेदी करू नये जेणे करून रशियाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.
कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी मोठा दिलासा! महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय…
मात्र यामध्ये भारतासाठी चिंताा वाढली आहे. कारण आखाती देशांतील युद्धामुळे त्या देशांतून येणाऱ्या तेल वाहतूकीवर परिणाम झाला. मग भारताने अमेरिकेने दिलेल्या सवलतीनंतर रशियाकडून तेल आणि गॅस खरेदीचं प्रमाण वाढवलं आहे. मात्र आता तर अमेरिकेने 100 टक्के टॅरिफ लावला तर मग भारतावरही आर्थिक दबाव येऊ शकतो.
