Download App

नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधा भारताकडून पुर्नविचार याचिका दाखल

  • Written By: Last Updated:

India files appeal : काही दिवसांपूर्वी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयान फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकार होते. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. दरम्यान, या माजी नौदल सैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने (Government of India) अपील केले आहे. या आठ जणांमध्ये माजी नौदल अधिकाऱ्यांचाही (former naval officers) समावेश आहे.

World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार! 

या लोकांनी मोठ्या भारतीय युद्धनौकांवर काम केले आहे. हे लोक कतारमधील दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. या लोकांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अज्ञात कारणावरून अटक करण्यात आली होती. या नौदल सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. सरकार या विषयाला अत्यंत महत्त्व देत आहे. त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले होते. परराष्ट्रमंत्र्यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट झाल्यानंतर देशातील जनतेला त्यांच्या सुटकेची आशा होती.

Pashan : ‘पाषाण’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा मान… 

दरम्यान, या आठ जणांवर हेरगिरीचा आरोप आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्यांना वाचवण्यासाठी भारताकडून पावलं उलण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की या प्रकरणात अपील दाखल करण्यात आले आहे. दोहा येथील दूतावासाला 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा भारतीय कैद्यांना ‘कॉन्स्युलर ऍक्सेस’ची संधी मिळाली. आम्ही त्यांना संपूर्ण कायदेशीर आणि राजनयिक पाठबळ देत राहू, असं सांगितलं.

कोण आहेत ते 8 भारतीय?

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते. ही कंपनी लष्करी दलाशी निदडीत उपकरणे पुरवते. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश हे कतार तुरुंगात आहेत. निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना 2019 मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या आठ जणांना कतारची गुप्तचर संस्था SSB ने 30 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. दोहा येथील भारतीय दूतावासाला सप्टेंबरमध्ये त्यांच्या अटकेची माहिती देण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सुखरूप परत आणण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे.

Tags

follow us