Same Gender Marriage : 33 देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता; तर याठिकाणी मिळतो मृत्यूदंड, वाचा भारतातील स्थिती काय?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 13T183455.560

Same Gender Marriage :  समलैंगिक लग्नाचा मुद्दा आज पुन्हा एकदा देशभरात चर्चिला जात आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आमचा समलैंगिक विवाहाला विरोध असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. समान लिंग असलेल्यांनी सोबत राहणे हा गुन्हा नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु याचा भारतीय कुटूंबावर परिणाम वाईट होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याआधी देखील दिल्ली हायकोर्टामध्ये केंद्र सरकारने याला विरोध केला होता.

या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले आहे. या प्रकरणावर पुढील सुनवाई 18 एप्रिल रोजी होणाल असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, समलैंगिक विवाह हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या प्रकरणावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने विचार करणे आवश्यक आहे.

‘नाटू नव्हे हे तर लुटो-लुटो अदानी-मोदींचा फोटो शेअर करत काँग्रेसनं डिवचलं

दरम्यान जगामध्ये सध्या 33 देश असे आहेत की तिथे समलैंगिक विवाहाला मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी बहुतांश देशांमध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाली आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा सर्वात पहिला देशा नेदरलँड बनला आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रिया, ताइवान, कोलंबिया, अमेरिका, ब्राझील, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, क्यूबा, डेनमार्क, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, माल्टा, फिनलँड, ब्रिटेन या सर्व देशांमध्ये समलैंगिक विवाहाला मंजूरी देण्यात आली आहे.

Pawan Khera : तुम्ही देशाच्या तीन पिढयांचा अपमान केला; मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात, देश, देव नाहीत

एका रिपोर्टच्या अंदाजानुसार, पाकिस्तान, अफगानिस्तान, संयुक्त अमीरात, कतार आणि मॉरिटानिया या देशांमध्ये शरिया कायद्यानुसार समलैंगिक संबंध ठेवल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ शकते. तसेच ईरान, सोमालिया याभागात देखील अशाच प्रकारे कायदा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube