मोठी बातमी : इंडियन नेव्हीच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा; देशात खळबळ

  • Written By: Published:
मोठी बातमी : इंडियन नेव्हीच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा; देशात खळबळ

दोहा :  हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. हे आठ माजी अधिकारी लोक कतारच्या अल दाहरा कंपनीत काम करत होते असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी भारताकडून कतार सरकारला माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर दया दाखवून त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले होते. मात्र, हे सर्व अधिकारी इस्रायलसाठी हेरगिरी करत होते, असा दावा कतार सरकारने केला होता. त्यानंतर आता या अधिकाऱ्यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Indian Navy Eight Ex officers Get Death Penalty In Qatar)

घटनेवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून

आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात असून, या प्रकरणात सर्व कायदेशीर पर्यायांबाबत विचार केला जात आहे. ही संपूर्ण घटना अत्यंत महत्त्वाची असून, आम्ही त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. तसेच या प्रकरणात सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य देत राहू असेही MEA ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

30 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आले होते ताब्यात 

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठही माजी अधिकाऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये कमांडर (निवृत्त) पूर्णेंदू तिवारी यांचादेखील समावेस असून, त्यांना 2019 मध्ये प्रवासी भारती सन्मान पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पूर्णांदू तिवारी यांनी भारतीय नौदलात अनेक मोठ्या जहाजांचे नेतृत्व केले आहे.

अल दाहरा कंपनीत करत होते काम 

प्रकाशित मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्तीनंतर हे सर्व नौदलाचे माजी अधिकारी कतार येथील अल दाहारा या खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे नाव Dahra Global Technology and Consultancy Services असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube