भारत-नेपाळ पुन्हा दोस्ती ! 10 मुद्द्यांचा रोडमॅप, नेपाळला किती हजार कोटींचे पॅकेज ?

India Nepal Relations-'विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ' या संकल्पनेतून दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न.

Balen-Shah India Vist

Balen Shah India Vist

PM Balen Shah visit to India : नेपाळमध्ये सत्तातंर घडवून आणून पंतप्रधान झालेले बालेन शाह (Balen Shah) पुन्हा भारताच्या जवळ आले आहेत. शाह हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भारत आणि नेपाळ (Nepal) यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुरामुळे उद्धवस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी 24 हजार कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यात सोमवारी (23 नोव्हेंबर) नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदी यांनी ऑगस्ट महिन्यातील पुरामध्ये जीवितहानी झाल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

भारत-नेपाळ संबंधांसाठी 10 मुद्द्यांचा रोडमॅप
‘विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ’ या संकल्पनेतून दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला. ऊर्जा, जलविद्युत, व्यापार, पायाभूत सुविधा, सीमापार संपर्क व्यवस्था आणि तंत्रज्ञान अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी अनेक सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये न्यायवैद्यक विज्ञान, सुरक्षा, आरोग्य, उपग्रह दळणवळण, पारंपरिक औषधोपचार आणि शहरी विकास या क्षेत्रांचा समावेश आहे.

पोलीस आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढणार
गुन्हे तपास आणि न्यायवैद्यक विज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि नेपाळ पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याशिवाय भारताच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाने (Rashtriya Raksha University) नेपाळच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीसोबत स्वतंत्र करार केला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील पोलीस प्रशिक्षण, संशोधन आणि सुरक्षा व्यवस्थेतील सहकार्याला चालना मिळणार आहे. नेपाळमधील सरकारी अधिकाऱ्यांची प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठीही भारत मदत करणार आहे. भारताचे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग तसेच नेपाळचे प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय यांच्यात प्रशिक्षण आणि क्षमता विकासासंदर्भात करार झाला आहे.

आयुर्वेद, आरोग्य आणि शहरी विकासावर भर
भारत आणि नेपाळ यांच्यात आयुर्वेद तसेच पारंपरिक औषधोपचार पद्धतींच्या विकासासाठी सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय आरोग्य, औषधनिर्मिती, पशुधन आणि मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठीही करार करण्यात आले आहेत. शाश्वत शहरी विकासाच्या क्षेत्रातही दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत. या माध्यमातून नेपाळमधील शहरांचा पायाभूत विकास आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारताचे सहकार्य मिळणार आहे.


१ फेसबुक पोस्ट अन् धुळ्याच्या महापौर रुग्णालयात; भाजप विरुद्ध गोरक्षक संघर्ष पेटला, नेमकं प्रकरण काय?

दक्षिण आशिया उपग्रहाच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्था मजबूत होणार
भारत आणि नेपाळमधील तंत्रज्ञानविषयक सहकार्यालाही या दौऱ्यात महत्त्व देण्यात आले. नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सोबत करार केला आहे. या करारानुसार दक्षिण आशिया उपग्रहाचा वापर करून नेपाळमध्ये उपग्रह दळणवळण नेटवर्क उभारण्यात येणार आहेत. यामुळे डिजिटल संपर्क आणि दळणवळण सुविधांना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

अयोध्या ते जनकपूरदरम्यान नवी रेल्वेसेवा
भारत आणि नेपाळमधील धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वे आणि रस्ते संपर्क वाढवण्यावरही भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालेन शाह यांनी अयोध्या ते नेपाळमधील जनकपूरधामदरम्यान सुरू होणाऱ्या ‘सरयू-कमला एक्स्प्रेस’ या नवीन साप्ताहिक रेल्वेसेवेचा ऑनलाइन शुभारंभ केला. याशिवाय उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला तहसीलमध्ये काली नदीवर बांधण्यात आलेल्या चर्चुम आंतरराष्ट्रीय मोटार पुलाचे उद्घाटनही दोन्ही नेते करणार आहेत. या रेल्वे आणि रस्ते संपर्कामुळे भारत-नेपाळमधील नागरिकांची ये-जा तसेच व्यापाराला चालना मिळणार आहे.


Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव ‘पश्चिम बंगा’ करणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा

भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रविवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमधील संपर्क व्यवस्था, व्यापार, पारगमन, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण आणि नागरिकांमधील परस्पर संबंध अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

Exit mobile version