INS Brahmaputra Ship Fire : भारतीय नौदलाच्या आयएनएस (INS) ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेला आग लागल्याची घटना घडली आहे. ही युद्धनौका मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये देखभालीसाठी ठेवण्यात आली होती, त्या दरम्यान हा अपघात झाला, (Fire ) या अपघातानंतर एक कनिष्ठ नाविक बेपत्ता. तसंच, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात झाला तेव्हा बहु- रोल फ्रिगेट नेव्हल डॉकयार्ड दुरुस्तीचं काम चालू होतं.
आग आटोक्यात अफवांवर विश्वास ठेवू नका; व्हिडीओ शअर करत राहत फतेह अली खानने अटकेच्या बातम्या फेटाळल्या
नौदल डॉकयार्ड आणि बंदरातील इतर जहाजांच्या तांत्रिक पथकांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. या प्रकरणाचा तपास सुरू असून नुकसानीचा अंदाजही घेतला जात असल्याचं नौदलाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. नौदल, डॉकयार्ड, मुंबई आणि बंदरातील अन्य जहाजे अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे जहाज एका बाजूला झुकले आहे. सर्व प्रयत्न करूनही जहाज पुन्हा सरळ स्थितीत आणले जाऊ शकले नाही. दरम्यान, बेपत्ता खलाशाचा शोध सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. तसंच, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ब्रह्मपुत्रा जहाजाचं वैशिष्ट्य
INS ब्रह्मपुत्रा हे पहिले स्वदेशी बनावटीचं ‘ब्रह्मपुत्रा’ वर्गाचं मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. ते एप्रिल २००० मध्ये भारतीय नौदलात सामील झालं होतं. जहाजावर ४० अधिकारी आणि ३३० खलाशी आहेत. जहाज मध्यम पल्ल्याच्या, जवळच्या अंतरावरील आणि विमानविरोधी शस्त्रे, पृष्ठभागावरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो लाँचर्सने सुसज्ज आहे. या जहाजामध्ये सागरी युद्धाच्या सर्व पैलूंचा समावेश करणारे सेन्सर्सची विस्तृत श्रेणी आहे आणि ते सीकिंग आणि चेतक हेलिकॉप्टर चालविण्यास सक्षम आहे. INS ब्रह्मपुत्रेचे विस्थापन ५ हजार ३०० टन, लांबी १२५ मीटर, बीम १४.४ मीटर आहे आणि ती २७ नॉट्सपेक्षा जास्त वेगाने काम करण्यास सक्षम आहे.
भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आज मुंबईत येत आहेत. INS ब्रह्मपुत्रा या युद्धनौकेला लागलेल्या आगीच्या घटनेची ते पाहणी करणार आहेत. युद्धयौकेची मोठी हानी झाली आहे. त्रिपाठी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना घटनेची माहिती दिली.#INSBrahmaputra #IndiaNavy pic.twitter.com/I2un10JrBw
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 23, 2024