Kuwait Fire दुर्घटनाग्रस्तांसाठी सोनू सूदचं आवाहन; सरकारला केली मदतीचा मागणी

Kuwait Fire दुर्घटनाग्रस्तांसाठी सोनू सूदचं आवाहन; सरकारला केली मदतीचा मागणी

Kuwait Fire Sonu Sood Demand for help to Government : दक्षिण कुवेतमधील (Kuwait Fire) मंगफ येथील बुधवारी (दि.12) स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 भारतीय कामगांराचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावर आता अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) कुवेतच्या आगीच्या घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांबद्दल बोलला आणि सर्वांना त्यांच्या कुटुंबासाठी योगदान देण्याचे आवाहन केलं आहे.

आरएसएसच्या ‘त्या’ लेखावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्याबद्दल…

सोनू सूदने कुवेतमध्ये घडलेल्या भयानक घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. आगीच्या भीषण घटनेत भारतातील 40 हून अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे याबद्दल बोलताना ‘फतेह’ स्टार अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्यक्ती आणि सरकारला या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे.

Rohit Saraf च्या इश्क विश्क रिबाउंडचं नवं गाणं रिलीज, ‘गोरे गोरे मुखडे पे’ ची प्रेक्षकांना भूरळ

कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील कामगार कसे उदरनिर्वाहासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष करतात यावर त्याने भाष्य केलं असून सरकारला त्यांच्या कुटुंबांना काळजी आणि आर्थिक सहाय्य किंवा नोकऱ्या देण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि त्यांचे कुटुंब सुरळीत चालू राहतील.

Rutuja Bagwe: ऋतुजा बागवेने ‘माटी से बंधी डोर’ मधील तिच्या भूमिकेविषयी म्हटले असे काही…!

जनतेच्या नायकाने व्हिडिओ शेअर करताच त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याची चिंता व्यक्त करत त्याचे कौतुक केले. अशा गंभीर घटनांच्या वेळी तो गरजूंना मदत करण्यासाठी कसा पुढे येतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. एका युजरने कमेंट केली, “बॉलिवुड इंडस्ट्री के प्रामाणिक हिरो”, तर दुसऱ्याने “गरीबांचा मसिहा” अशी कमेंट केली.

अभिनेता त्याच्या चाहत्यांची मने जिंकत असताना लवकरच तो फतेह घेऊन येणार असून सोनू सूद सायबर क्राइम थ्रिलर ‘फतेह’ मध्ये दिसणार आहे. जो हॉलीवूडच्या कलाकारांच्या बरोबरीने असल्याचे वचन देतो. अभिनेता नसीरुद्दीन शाह हॅकरच्या भूमिकेत असल्याची अफवा आहे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज