Kuwait Fire : कुवैतमध्ये इमारतीला भीषण आग; 40 भारतीय कामगारांचा होरपळून मृत्यू, 30 जखमी
40 Indians Killed In Fire At Kuwait Building Housing Workers, 30 Injured : दक्षिण कुवेतमधील मंगफ येथील स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 भारतीय कामगांराचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 30 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेले भारतीय नागरिक केरळ येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी (दि.12) स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास लागली. कुवेतच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून जखमींना योग्य उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
#Kuwait Mangaf Fire: Initial causes indicate poor storage on the ground floor and the presence of many gas cylinders, Firefighters, MOI and MOH to assess the deaths and injuries.. #الكويت pic.twitter.com/LNCpkhZdae
— Ayman Mat News (@AymanMatNews) June 12, 2024
परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
या भीषण आगीच्या घटनेनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर आणि पूर्ण बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. कुवैतमधील भारतीय दुतावास या घटनेवर लक्ष ठेवून असून, सर्वांना सर्वतोपरी मदत करेल असे जयशकंर यांनी सांगितले आहे.
Deeply shocked by the news of the fire incident in Kuwait city. There are reportedly over 40 deaths and over 50 have been hospitalized. Our Ambassador has gone to the camp. We are awaiting further information.
Deepest condolences to the families of those who tragically lost…
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 12, 2024
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुवैतमधील मंगफ येथे एक स्थलांतरीत कामगारांची इमारत आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरात आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच काही कामगारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. यात अनेकांचा मृत्यू झाला. तर, अनेकांना वेळेत बाहेर न पडता आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या इमारतीत सुमारे 195 मजूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत मल्याळी व्यापारी केजी अब्राहम यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, इमारतीत आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#UPDATE | A fire that broke out in a building housing workers in the city of Mangaf in southern Kuwait early on Wednesday has killed at least 41 people, the country's deputy prime minister Sheikh Fahad Yusuf Saud Al-Sabah said during a visit to the site, reports Reuters
— ANI (@ANI) June 12, 2024
भारतीय दुतावासाने जारी केले हेल्पलाईन नंबर्स
कुवैतमधील मंगफ येथील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 40 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या आगीत अडलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधित कागारांच्या कुटुंबियांनी +965-65505246 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.
Adarsh Swaika, Ambassador of India to Kuwait visited Mubarak Al-Kabeer Hospital, where 11 workers injured in today's fire have been admitted. 10 of them are expected to be released today & one in hospital is reportedly stable. He met with patients still in the hospital & assured… pic.twitter.com/ik7vmWHgXU
— ANI (@ANI) June 12, 2024
इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश
या भीषण अपघातानंतर कुवैतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसेफ अल-सबाह यांनी पोलिसांना इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. कुवेतचे उपपंतप्रधान फहाद युसूफ अल सबाह यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.