तैवान चीनचा नाहीच! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चाल भारताने केली निकामी; नेमकं काय घडलं?

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भारत चीन संबंधांवर (India China Relations) चर्चा करण्यात आली. यानंतर चीन ज्यासाठी ओळखला जातो तो प्रकार चीनने केलाच. या भेटीनंतर चीनने एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा उल्लेख होता. या चर्चेत एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी तैवान हा चीनचा भाग असल्याचा दावा केला असे नमूद केले होते. मात्र भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तैवानबाबतीत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात म्हटले होते की एस. जयशंकर यांची वांग यी यांच्याबरोबर चर्चा झाली. यात त्यांनी म्हटले की स्टेबल को ऑपरेटिव आणि फॉर्वर्ड लुकिग इंडिया चायना संबंध दोन्ही देशांच्या हितात आहेत आणि हे की तैवान चीनचा भाग आहे. निवेदनातील याच वक्तव्यावर भारताने तत्काळ आक्षेप नोंदवत प्रतिक्रिया दिली.
सूत्रांनी सांगितले की याबाबतीत भारताने भूमिका स्पष्ट केली आहे. अन्य जगाप्रमाणेच भारताचेही तैवानशी नाते प्रामुख्याने अर्थव्यवस्था, टेक्नॉलॉजी आणि कल्चरल संबंधांवर आधारीत आहेत. आम्ही यापुढेही असेच संबंध कायम ठेवणार आहोत. भारताचा तैवानशी व्यापार आहे. पण कोणतेही डिप्लोमॅटिक संबंध नाहीत.
रशिया-युक्रेन युद्धविरामात युरोपीय आयोगाची आडकाठी; डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगणार?