मित्राच्या शपथविधी समारंभाला जाणार नाही PM मोदी, एस जयशंकर करणार भारताचं प्रतिनिधित्व

Donald Trump Oath Ceremony : अमेरिकेत 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी (Donald Trump Oath Ceremony) समारंभाची

  • Written By: Published:
US Tariff PM Modi Positive Replay after Donald Trump ask for discussions

Donald Trump Oath Ceremony : अमेरिकेत 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी (Donald Trump Oath Ceremony) समारंभाची तयारी सुरू झाली असून या शपथविधी समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उपस्थित राहणार नसल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाकडून देण्यात आली आहे. या शपथविधी समारंभामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्र्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र या समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का सहभागी होणार नाही याची माहिती परराष्ट्र मंत्र्यालयाने दिलेली नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारी रोजी होणार आहे आणि अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला परदेशी नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, ट्रम्प यांच्या टीमने आतापर्यंत भारतासह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली आणि एल साल्वाडोरचे नेते नायब बुकेले यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “ट्रम्प-व्हान्स उद्घाटन समितीकडून आमंत्रण मिळाले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे., अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहे. या भेटीदरम्यान, परराष्ट्र मंत्री (जयशंकर) भविष्यातील अमेरिकन प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत तसेच समारंभात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या काही इतर मान्यवरांशीही भेटी घेतील. असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

‘शरद पवारांचं राजकारण 20 फूट जमिनीमध्ये गाडलं’ अमित शाह यांची बोचरी टीका

तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे मित्राच्या शपथविधी समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का ? जाणार नाही. याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

follow us