महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य, गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास; एस. जयशंकर

महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य,   गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास; एस. जयशंकर

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी

S Jaishankar Says Maharashtra most developed state : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर मोठं विधान केलंय. ते म्हणाले की, महाराष्ट्र देशात सर्वाधिक विकसित राज्य (Maharashtra Development) आहे. गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे.राज्य जीडीपीमध्ये देश पाचव्या क्रमांकावर आहे. दहा वर्षापूर्वी राज्य दहाव्या क्रमांकावर होतं. ही परिस्थिती अशीच बदलली नाही, असं वक्तव्य एस जयशंकर (Foreign Affairs Minister) यांनी केलंय. पायाभूत सुविधांमध्ये मोदी सरकारने बदल घडवला.

‘मावळ’मध्ये मोठा ट्विस्ट! उमेदवार न देता मविआचा चक्क अपक्षाला पाठिंबा; कारण काय?

गुंतवणूकदार राज्यातील परिस्थिती पाहून गुंतवणूक करतात. प्रकल्प आले नाहीत तर राज्यातील सरकारची भूमिका असते. केवळ केंद्र सरकारवर
राज्य सरकारच्या कामगिरीवर गुंतवणूकदार येतात. राज्य आणि केंद्र एका विचाराचे असल्यास गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण असतं, असं एस. जयशंकर म्हणाले आहेत. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा कशी आहे? याबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, जर्मनी चान्सलर भारत दौऱ्यावर होते. तेव्हा जर्मन उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

बांग्लादेश प्रश्नावर बोलताना जयशंकर म्हणाले की, मागील दशकात पूर्वीपेक्षा मोठा फरक पडला आहे. घुसखोरांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय. मोदी सरकार देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करून केंद्र सरकार देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवते. मात्र, अनेकदा अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी समान विचारांच्या सरकारची गरज आहे. राज्य सरकारची गंभीर भागीदारी सहकार्य केंद्राला मिळणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नगर एमआयडीसीच्या माध्यमातून मोठा रोजगार प्राप्त होणार; संग्राम जगतापांनी फोडला प्रचाराचा नारळ

भारत चीन संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले की, लडाखमधील पेट्रोलिंग परिस्थितीवर दोन्ही देशांत एकमत झालं होतं. दोन्ही सेना जवळ आल्या होत्या. आता परत गेल्या असल्याचं जयशंकर म्हणाले आहेत. काऊंटर दहशतवादाचे मुंबई सिंबॉल आहे. ज्या हॉटेलमध्ये दहशतवादी घटना घडली, त्याच ठिकाणी आम्ही काऊंटर टेरेरिझम बैठक घेतली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रमाणे घटना पुन्हा घडू देणार नाही. पूर्वीप्रमाणे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असं आश्वासन देखील जयशंकर यांनी दिलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube