‘पंतप्रधान मोदी होते, त्याच खोलीत मी होतो…’, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी फेटाळला ट्रम्पचा युद्धबंदीचा दावा

S Jaishankar Rejects Donald Trumps Ceasefire Claim : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trumps) दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणल्याचा दावा केला होता. आता हा दावा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी (S Jaishankar) पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यू यॉर्कमधील न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) संपूर्ण कहाणी आणि त्यानंतरच्या घटना सांगितल्या.
आर्थिक युद्ध…
यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी फोनवर चर्चा केली, तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खोलीत उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की व्यापार आणि युद्धबंदीशी संबंधित (Ceasefire Between India And Pakistan) कोणतीही चर्चा झाली नाही. भारताने पाकिस्तानच्या धमक्या नाकारल्या आणि दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली. जयशंकर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला ‘आर्थिक युद्ध’ म्हटले. ते काश्मीरमधील पर्यटन नष्ट करण्याचा आणि धार्मिक हिंसाचार भडकवण्याचा कट असल्याचे म्हटले. (Operation Sindoor)
मी तुमच्यासारखा 150 दिवस लपलो नाही; धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसांगारांच थेट उत्तर
पाकिस्तान चर्चेसाठी तयार…
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, 9 मे रोजी रात्री पाकिस्तानने भारतावर मोठा हल्ला केला, परंतु भारतीय सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी जयशंकर यांच्याशी बोलून पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. त्याच दिवशी दुपारी पाकिस्तानचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी त्यांचे भारतीय समकक्ष लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना फोन करून युद्धबंदीची विनंती केली. परराष्ट्र मंत्री म्हणाले, मी स्वतः काय घडले, ते पाहिले.
कुदरत के बवंडर का…इशारा अब समझ लो! गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा
ट्रम्प यांनी त्यांच्या दाव्यात काय म्हटले?
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात द हेग येथे पत्रकार परिषदेत दावा केला होता की, त्यांनी व्यापार दबाव आणून भारत आणि पाकिस्तानला युद्धबंदीसाठी भाग पाडले. याआधीही ते सोशल मीडियाद्वारे असे दावे अनेकदा करत आहेत. ते म्हणाले होते की, मी म्हटले होते की, जर तुम्ही लोक आपापसात लढलात तर व्यापार होणार नाही.