India–Pakisatan War : भारत-पाकिस्तानमध्ये सलग 86 तास युद्ध चालल्यानंतर (India–Pakisatan War) अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलीयं. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचं चित्र पाहाला मिळत आहे. अशातच आता भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आलीयं. पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय. मागील आठवडाभरातील तिसरी उच्चस्तरीय बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ललकारलंय.
We have a very clear position on Kashmir, there is only one matter left- the return of Pakistan-Occupied Kashmir (PoK). There is nothing else to talk. If they talk about handing over terrorists, we can talk. We don't have any intention of any other topic. We don't want anyone to… pic.twitter.com/QWrmbFuK8y
— ANI (@ANI) May 11, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तान जर दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात देणार असतील तर आम्ही पुढील चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेंस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात चर्चा झालीयं. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी वेंस यांना आपली भूमिका समजावून सांगितली आहे. जर पाकिस्तान काही कुरापती करीत असेल तर भारत त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.
तसेच ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार दोन्ही देशांच्या एनएसए आणि विदेश मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. फक्त पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओसोबत चर्चा केली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांन भारत पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त काश्मीर मुद्द्यात मध्यस्थीची तयार दर्शवली. परंतू भारत सरकारने आज आपली भूमिका स्पष्ट केलीयं. आम्हाला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. पाकव्याप्त काश्मीर याच मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारातील उपस्थिती म्हणजे थेट सामील; शरद पवारांचा पाकिस्तानवर वार
7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या मिटिंगमध्ये तिन्ही सेनाप्रमुख, सीडीएस, एनएसए आणि संरक्षण मंत्री उपस्थित होते. या बैठकीत नेमके कोणती खलबतं झाली, यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या बैठकीनंतर भारताई हवाई दलाने एक ट्विटर पोस्ट केली आहे.
या ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत, जाणीवपूर्वक आणि सावधगिरीने पार पाडण्यात आले. ऑपरेशन्स अजूनही सुरूच आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. सर्वांना खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन, भारतीय हवाई दलाने केलं आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये. खरं तर ऑपरेशन सिंदूरचा हेतू दहशतवाद्यांच्या स्थानांवर हल्ला करणे, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे, असा आहे