India-Pakistan Match Petition : येत्या 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा होणारा सामना रद्द करण्यासाठी दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला असल्याचं समोर आलंय. हा एक सामना असून एक सामना होऊ द्या, असं सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याला सांगण्यात आलंय. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या बेंचसमोर ही सुनावणी पार पडली.
‘Let Match Go On’: Supreme Court Declines Urgent Listing Of Plea To Cancel India-Pakistan Asia Cup Cricket Match |@DebbyJain #SupremeCourt #AsiaCup2025 https://t.co/CVvyOzsq97
— Live Law (@LiveLawIndia) September 11, 2025
संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद; व्हॉट्सअप चॅट्समुळे नवा ट्विस्ट…
याचिकाकर्त्याच्या वकीलांनी यावर न्यायालयासमोर युक्तिवाद केला असून न्यायालयाने तत्काळ सुनावणीसाठी नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी न्यायालयात केलीयं. भारत-पाकिस्तान सामना रविवारी पार पडणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होईल. हा एक सामना होऊ द्या, सामना याच रविवारी आहे, काय करु शकतो? असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा; नॅककडून ‘A’ ग्रेड मानांकन…
याचिकाकर्त्याने काय म्हटलं?
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक भारतीय सैनिकांनी आपलं बलिदान दिल आहे. असं असताना भारत आणि पाकिस्तान सामना होणे हा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचत आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशासोबत सामना खेळणे हे भारतीय सैन्याचं मनोबल कमजोर केल्यासारखंच असल्याचं याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटलंय.