अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा; नॅककडून ‘A’ ग्रेड मानांकन…

पुण्यातील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला असून नॅककडून विद्यापीठाला 'A' ग्रेड मानांकन मिळालंय.

Naac

Ajinkya D.Y.Patil University : अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने (Ajinkya D.Y.Patil University) शैक्षणिक उत्कृष्टतेत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठलायं. राष्ट्रीय मानांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC) विद्यापीठाला प्रतिष्ठित ‘A’ ग्रेड मानांकन मिळाले आहे. या यशासह विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविला असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचा ‘श्री गणेशा’ दोन विश्वासू साथीदारांसह उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थावर’

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगला (SOE) NIRF 2025 रँकिंगमध्ये २०१–३०० बँडमध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाला (MBA) आणि बायोटेक इंजिनिअरिंग विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (NBA) ची अधिकृत मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुलपती डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांना लंडनमध्ये ‘भारत भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ९२% ट्रस्ट इंडेक्स स्कोअर मिळवत विद्यापीठाला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ ही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. विद्यापीठाने संशोधन आणि तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र सुपरकॉम्प्युटर प्रकल्पाचा शुभारंभ केला असून GNFZ परिषदेत नेट झिरो प्रमाणपत्र मिळवणारे ते देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

अटल सेतूवरुन शिवडीला जात असताना एका कारचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

संशोधन उत्कृष्टतेतून विद्यापीठाचे निबंध आणि पुस्तके Springer, IEEE, Wiley, CRC Press यांसारख्या प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाली आहेत. फिल्म व मीडिया शाळेत BBC व Dolby यांच्या सहकार्याने कार्यशाळा आणि साऊंड कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आले. २०२५–२६ पासून फॉरेन्सिक सायन्स, डेटा सायन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी यांसारखे नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांनीही जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी DXS24 ग्लोबल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पहिले स्थान पटकावले. देवाशीष शर्मा (२०२६ बॅच) या विद्यार्थ्याला गुगलकडून ₹५५ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

follow us