World Corruption Index : जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांची यादी समोर आली आहे. यादीत भारताचाही (World Corruption Index) नंबर आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 च्या करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताची एका (Corruption in India) अंकाने घसरण झाली आहे. ज्या देशाचे अंक जास्त असतात रँकिंगमध्ये तो देश पुढे असतो. 90 अंक असणारा डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच या देशात भ्रष्टाचार अतिशय कमी आहे. भारताचा विचार केला तर 2024 मध्ये भारताचा स्कोअर 38 होता. 2023 मध्ये 39 होता. म्हणजेच भारताला एका अंकाचे नुकसान झाले आहे. 2023 मध्ये भारताची रँकिंग 93 होती. आणि 39 अंक होते. 2024 मध्ये 38 अंक मिळाले आणि भारत 96 व्या क्रमांकावर आला. 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षात भारत 85 व्या क्रमांकावर होता.
भारताचे शेजारी देशांमध्ये पाकिस्तान 135, श्रीलंका 121, बांग्लादेश 149 तर चीनची रॅकिंग 76 आहे. या यादीवरून लक्षात येते की जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात भ्रष्टाचार आहेच. भ्रष्टाचाराची (Corruption in World) समस्या संपवून टाकण्यासाठी अनेक देशांकडून प्रयत्नही केले जात आहेत. अब्जावधी लोक ज्या देशांत राहतात तिथे भ्रष्टाचाराची समस्या फार मोठी आहे. या देशांत मानवाधिकारही अतिशय कमकुवत आहे.
भ्रष्टाचार केला तर सुट्टी नाहीच, 10 वर्षांत तब्बल 50 लाख लोकांना शिक्षा; चीनमध्ये काय घडतंय?
जगातील सर्वाधिक भ्रष्ट देशांचा विचार (Most Corrupted Country) केला तर यामध्ये 8 अंकांसह दक्षिण सूदान (South Sudan) आघाडीवर आहे. दक्षिण सूदानचा 180 वा नंबर आहे. यानंतर सोमालिया 9 अंकांसह 179, व्हेनेझुएला 10 अंकांसह 178, सीरिया 12 अंकांसह 177 व्या क्रमांकावर आहे. इक्युआटोरियल गुआइना, लीबिया, यमन हे देश 13 अंकांसह 173 व्या क्रमांकावर तर निकारागुआ 14 अंकांसह 172 व्या क्रमांकावर आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल एक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे. जर्मनीतील बर्लिन (Germany) शहरात या संस्थेचे मुख्यालय आहे. संस्था दरवर्षी करप्शन परसेप्शन्स इंडेक्स जारी करते. या अहवालात जगभरातील देशांत किती भ्रष्टाचार आहे याची माहिती दिली जाते.
एखाद्या देशात किती भ्रष्टाचार आहे याची माहिती घेण्यासाठी तीन प्रकाराच्या डेटाचा सहभाग घेतला जातो. हा डेटा 13 विविध प्रकारचे सर्वे आणि संस्थांनांच्या माध्यमातून गोळा केला जातो. यामध्ये जागतिक बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांसारख्या संस्थाही सहभाग असतात. या व्यतिरिक्त विविध देशांचे तज्ज्ञ आणि व्यावसायिकांशीही चर्चा केली जाते. या विविध मार्गांनी येणाऱ्या माहितीचे संकलन केले जाते. यानंतर रँकिंग तयार केली जाते.
भारत 600 कोटीत चंद्रावर पोहचला अन् इकडं.. भ्रष्टाचारावरून जयंत पाटलांचा हल्लाबोल