भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताचे गरीबीत लक्षणीय घट केली आहे. मागील 15 वर्षांच्या कालावधीत भारतात 41.5 कोटी नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन ते गरीबीच्या पेचातून बाहेर पडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतात मागील 15 वर्षांत जवळपास 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून करण्यात आला आहे. जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाच्या अपडेटमध्येही गरीबीमध्ये घट झाल्याचं म्हटलं आहे. गरीबी घटल्याची आकडेवारी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ऑक्सफर्ड पॉव्हर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तटकरेंनी रायगड सोडून बोलावं; पालकमंत्री फक्त ‘भरतशेठ’ होणार! गोगावलेंनी थोपटले दंड
भारतात 2005-2006 ते 2019-2021 या 15 वर्षांत एकूण 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचं संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार
भारतासह 25 देशांनी 15 वर्षात त्यांचे जागतिक MPI मूल्ये (गरिबी) यशस्वीरित्या घटली आहे. ही आकडेवारी या देशांमध्ये वेगाने प्रगती झाल्याचं सूचक दर्शवत आहे. यामध्ये कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, भारत, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम देशांचा समावेश आहे.
वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये, भारत 1428.6 दशलक्ष लोकसंख्येसह चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. अहवालात म्हटले की, विशेषतः भारताने गरिबीत लक्षणीय घट दर्शविली आहे. मागील 15 वर्षांच्या (2005-06 ते 2019-21) कालावधीत 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.
अहवालानूसार, कोरोना काळात सर्वसमावेशक डेटाच्या अभावामुळे तत्काळ संभाव्यतेचे मूल्यांकन करण्याचे आव्हाने उभी होती. 2005-2006 ते 2019-2021 या काळात भारतात 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेत. 2005-2006 मध्ये जिथे गरिबांची लोकसंख्या 55.1 टक्के होती, ती 2019-2021 मध्ये 16.4 टक्के झाली आहे.
ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंची खोचक टीका, म्हणाले, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची…
2005-2006 मध्ये, सुमारे 64.5 कोटी लोकांचा भारतातील दारिद्र यादीत समावेश करण्यात आला होता. 2015-2016 मध्ये ही संख्या सुमारे 37 कोटी आणि 2019-2021 मध्ये 23 कोटी इतकी कमी झाली होती. अहवालानुसार, भारतातील सर्व निर्देशकांमध्ये गरिबीत घट झाली आहे. गरीब राज्ये ज्यामध्ये वंचित जाती गटातील नागरिकांचा समावेश आहे, त्यांनी सर्वात वेगाने प्रगती केली आहे.
अहवालानुसार, भारतातील पोषण निर्देशकांखाली बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची संख्या 2005-2006 मधील 44.3 टक्क्यांवरून 2019-2021 मध्ये 11.8 टक्क्यांवर आली आहे. या काळात बालमृत्यूचे प्रमाण 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर आले. तसेच भारतात स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित राहिलेल्या गरिबांची संख्या 52.9 टक्क्यांवरून 13.9 टक्क्यांवर आली आहे.
Today Horoscope : ‘मिथुन’ राशीच्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील, वाचा राशीभविष्य
दुसरीकडे, जिथे 2005-2006 मध्ये 50.4 टक्के लोक स्वच्छतेपासून वंचित होते, त्यांची संख्या 2019-2021 मध्ये 11.3 टक्क्यांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणाबाबत या कालावधीत बहुआयामी गरीब आणि वंचित नागरिकांची टक्केवारी 16.4 वरून 2.7 वर आली आहे. वीजेशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आणि घर नसलेल्या गरीबांची संख्या 44.9 टक्क्यांवरून 13.6 टक्क्यांवर आली.
https://www.youtube.com/watch?v=DBDSOoNDDyU
भारताशिवाय इतर अनेक देशांतही गरिबांची संख्या घटल्याचं अहवालात म्हटलं आहे. गरिबी कमी करण्यात यश मिळविलेल्या देशांच्या यादीत 17 देश आहेत. या कालावधीच्या सुरुवातीला 25 टक्क्यांहून कमी लोकं गरीब होते. आणि भारत आणि काँगोमध्ये, या कालावधीच्या सुरुवातीला 50 टक्क्यांहून अधिक लोक गरीब होते. अहवालानुसार, 2005-2006 ते 2015-2016 या कालावधीत जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (एमपीआय) मूल्य निम्म्यावर आणणाऱ्या 19 देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे.