ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंची खोचक टीका, म्हणाले, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची…

ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंची खोचक टीका, म्हणाले, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची…

उद्धव ठाकरे राजकारणाच्या खालच्या स्तरावर उतरलेत, म्हणूनच ते आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घेत असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिराचं दर्शन घेऊन सुरुवात केलीय, त्यानंतर वाशिम, अमरावतीत छोटेखानी सभा घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बोट ठेवत बावनकुळेंनीही टीकास्त्र सोडले आहे.

Udhav Thackeray : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे, 2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, असा कौल दिला होता. जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर येऊ न देता तुम्ही शरद पवारांसोबत कट करून सत्तेवर आले होते, असं बावनकुळे म्हणाले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना भावासारखे सांभाळले आहे. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांन काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली असल्याचं ते म्हणाले आहेत.

दादा व काकातील संघर्षाला पुण्यातील आमदार कंटाळला ! थेट निवडणूक न लढण्याचा घेतला निर्णय

उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप :
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली होती. तसेच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढवला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे.

लहामटेंची दोनच दिवसात पलटी; शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात…

आम्ही भूकंप घडवणार नाही :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत राहणार आहेत. आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही. काँग्रेस पक्षातून भाजपात कोणी येणार असेल तर भाजपचे पंचे तयार आहेत. काँग्रेसने आपला पक्ष सांभाळावा, काँग्रेसमध्ये भूकंप होणार की नाही हे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगावं, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यातून सत्ताधाऱ्याविरोधात टीकेची तोफ डागण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे सध्या तरी सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याची परिस्थिती आहेत. बावनकुळेंच्या टीकेवर उद्धव ठाकरे आगामी सभेत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube