दादा व काकातील संघर्षाला पुण्यातील आमदार कंटाळला ! थेट निवडणूक न लढण्याचा घेतला निर्णय

  • Written By: Published:
दादा व काकातील संघर्षाला पुण्यातील आमदार कंटाळला ! थेट निवडणूक न लढण्याचा घेतला निर्णय

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याकडे आमदार खेचले आहेत. त्यात काही आमदार शरद पवारांकडून अजित पवारांकडे आले आहेत. परंतु काही आमदारांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. भूमिका जाहीर करून काही आमदार हे संभ्रम अवस्थेत आहे. कधी शरद पवारांकडे (Sharad Pawar) जात आहे. तर कधी अजित पवारांच्या गटात दाखल होत आहेत. पुण्यातील एक आमदारही संभ्रम अवस्थेत आहे. या आमदाराने आता थेट राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (ncp political crisis junar mla atul benke big decision not to contest election)

गेल्या आठवड्यात रविवारी अजित पवार व आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावे घेतले आहेत. त्यात दोघांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे. अनेक आमदार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आता थेट मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीवर बेनके यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्याबरोबर पुढील २०२४ ची निवडणूक लढविणार नसल्याचेही बेनके यांनी जाहीर केले आहे.

Rain Update: उत्तर भारतात ‘जल प्रलय’… हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर, अनेकांचा मृत्यू

विशेष म्हणजे मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बेनके यांनी भेट घेतली. त्यानंतर बेनके म्हणाले, ज्यांना जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या, मी तटस्थ राहणार आहे. पाणी प्रश्नासाठी संघर्ष करणार पण निवडणूक लढणार नाही. तर नाशिक जिल्ह्यातील आमदार सरोज अहिरे यांनीही आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.


ते आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेत…विखेंचा शरद पवारांना टोला

भूमिका जाहीर न करणारे आमदार आता बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहेत. रविवारीच नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार किरण लहामटे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडे आमदारांची संख्याबळ वाढलेले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube