काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मंत्री अनिल पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
Anil Patil : येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसतील. काँग्रेसचे अनेक आमदार खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. ते आज जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना दिसतील.(Many Congress MLAs, MPs in contact with NCP; Exciting statement of Minister Anil Patil)
पुढे पाटील म्हणाले आमची सर्व दार ही खुली आहेत, कोणत्याही नेत्याला आम्ही आहे त्या पद्धतीने मान सन्मान देवू. जो नेता अजित दादा यांच्यासोबत काम करणार असेल त्याच आम्ही घरी जावून स्वागत करू
आजही जे नेते इकडे तिकडे असतील किंवा संभ्रम अवस्थेत असतील त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी एक संघ व्हावं. अशी विनंती यावेळी पाटील यांनी केली.
आमचं आवाहन हे गल्लीतल्या नंतर पासून दिल्लीला नेत्यापर्यंत सर्वांना आहे यात एकनाथ खडसे असतील देवकर असतील माजी मंत्री सतीश पाटील सुद्धा आहे. यांना आवाहन नाही तर नम्र विनंती आहे…या सर्वांनी अजित दादा यांच्यासोबत पक्ष संघटन करावं.. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्यात बळकट करावा.
सुप्रिया सुळेंनंतर आता भुजबळही सरोज आहिरेंच्या भेटीला; त्या नेमक्या आहेत तरी कुठे?
जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहे त्यांचे त्याचे आम्हाला मागून पुढून संपर्क चालू आहेत.त्यामुळे आमच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील 100 टक्के कधी होतील याचा भरोसा नाही.
शेवटी बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरेंचं जर पक्ष पळवला जातो असं म्हणणं असेल तर नेत्यांचं काम आहे पक्ष कसा ठिकाण्यावर ठेवला पाहिजे. आपल्याला आपला पक्ष सांभाळता आला पाहिजे. आपल्या बद्दल असलेले मत त्यांना कळत नसेल तर घरातला सुद्धा पळून जातो.हे तर पक्ष आहेत