India Skills Report 2026 : रोजगार देण्यात उत्तर प्रदेश नंबर वन; महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर?

India Skills Report 2026 :  देशात सर्वाधिक रोजगार देण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य अव्वल स्थानी असल्याची माहिती इंडिया स्किल्स रिपोर्ट

India Skills Report 2026

India Skills Report 2026

India Skills Report 2026 :  देशात सर्वाधिक रोजगार देण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य अव्वल स्थानी असल्याची माहिती इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 मध्ये देण्यात आली आहे. या अहवालानुसार, रोजगार संधी आणि तरुणांची रोजगारक्षमता या बाबतीत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) देशात प्रथम क्रमांकावर आहे. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 नुसार उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक रोजगारक्षम राज्य ठरले आहे. तर या अहवालानुसार, राज्यनिहाय रोजगारक्षमता क्रमवारीत महाराष्ट्राने दुसरे तर कर्नाटकाने तिसरे स्थान पटकावले आहे.

रोजगारक्षमता वाढली

इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 (India Skills Report 2026) नुसार भारताची एकून रोजगारक्षमता 2025 मधील 54.81 टक्के वरुन 2026 मध्ये 56.35 पर्यंत वाढली आहे. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 नुसार हे तरुणांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत झालेली सुधारणा दर्शवते.  तर नावीन्य आणि लवचिक कार्यपद्धतींच्या युगात भारतातील तरुण नवीन आवश्यकतांशी वेगाने जुळवून घेत आहेत. ‘गिग इकॉनॉमी’चा (Gig Economy) वेगाने विस्तार होत आहे. असा अंदाज आहे की, 2030 पर्यंत देशातील ‘गिग’ कार्यबल 2.35 कोटींपर्यंत (23.5 दशलक्ष) पोहोचू शकेल असा निष्कर्ष इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026 ने दिला आहे. या अहवालानुसार, देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरे रोजगार आणि कौशल्य विकासाची प्रमुख केंद्रे म्हणून उदयास येत आहेत, ज्यामुळे लहान शहरांमधील तरुणांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.

एआय (AI) क्षेत्रात देशाची प्रगती

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)  क्षेत्रातही भारताची स्थिती बळकट होत असल्याचे दिसून येते. जागतिक एआय प्रतिभेमध्ये भारताचा वाटा 16 टक्के आहे आणि येथे 6 लाखांहून अधिक एआय व्यावसायिक कार्यरत आहेत. तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI), उत्पादन (Manufacturing), अक्षय ऊर्जा आणि आरोग्यसेवा ही क्षेत्रे रोजगार निर्मितीमध्ये आघाडीवर आहेत.

मोठी बातमी! राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर;17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (CII), ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (AICTE) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने ETS द्वारे प्रकाशित केलेला हा अहवाल, सात प्रमुख क्षेत्रांमधील 1,00,000 हून अधिक उमेदवार आणि 1,000 हून अधिक संस्थांच्या माहितीचे (डेटाचे) विश्लेषण करतो. हा अभ्यास ‘ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट’ (GET) दिलेल्या उमेदवारांची कामगिरी आणि कंपन्यांकडून मिळालेला अभिप्राय यांवर आधारित आहे.

अव्वल 10 रोजगारक्षम राज्ये

उत्तर प्रदेश

महाराष्ट्र

कर्नाटक

केरळ

पंजाब

मध्य प्रदेश

पश्चिम बंगाल

राजस्थान

अरुणाचल प्रदेश

जम्मू आणि काश्मीर

Exit mobile version