commonwealth Games : महाराष्ट्राच्या दिलीप गावितची ‘सुवर्ण’ कामगिरी…पदक पटकावणारा पहिला पुरुष ठरला!

स्कॉटलंडमधील ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिलीप गावितने सुवर्णपदक जिंकून सुवर्ण कामगिरी केलीयं.

Untitle (36)

Untitle (36)

commonwealth games : स्कॉटलंडमधील ग्लासगोमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (commonwealth games ) भारताने शानदार कामगिरी केली असून महाराष्ट्राच्या दिलीप गावितने 100 मीटर टँ४७ पॅरा-अॅथलेटिक्सच्या अंतिम शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर मोहम्मद बासिल मौरसिंगनाथ याने १०.६८ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले आहे. दिलीप महादू गावित (Dilip Gavit) याने १०.७१ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेते भारताच्या सुवर्णपदकांची संख्या तीनवर पोहोचली आहे, तर एकूण पदकांची संख्या १५ झाली आहे.

आवारापन 2’च्या प्रदर्शनासाठी अवघे 16 दिवस बाकी; निर्मात्यांनी उलगडला शिवम पंडितचा नवा लूक, ‘तेरा मेरा रिश्ता’ची भावनिक झलक प्रदर्शित

दिलीप गावितने कॉमवेल्थ स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात सुवर्णपदक जिंकून एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील पॅरा-ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय पुरुष खेळाडू ठरले आहेत. महिलांच्या शॉट पुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या शर्मिला यांच्यानंतर, या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारे ते दुसरे भारतीय पॅरा-ॲथलीट ठरले आहेत.

दिलीप गावितने १०.७१ सेकंदांची वेळ नोंदवत ही शर्यत पूर्ण केली, जी या हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तो महाराष्ट्रातील नाशिकजवळील तोरण डोंगरी गावचा रहिवासी असून एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आला आहे. लहानपणी झाडावरून पडल्यामुळे दिलीपच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती; योग्य वैद्यकीय उपचारांअभावी त्याचा हात कोपराच्या खालून कापावा लागला. याआधी, दिलीपला २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समधील पुरुषांच्या ४०० मीटर (T47) शर्यतीत सुवर्णपदक मिळाले होते.

लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था

दिलीप यांनी पॅरालिम्पिक्स हे आपले पुढील ध्येय असल्याचे सांगितले.सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिलीप गावित यांनी आपल्या पुढील उद्दिष्टाबद्दल भाष्य केले. त्यांनी नमूद केले की, त्यांची सुरुवात थोडी संथ झाली असली तरी नंतर त्यांनी हळूहळू वेग वाढवला आणि विजय मिळवणे ही एक अतिशय आनंददायी भावना होती.

या हवामानात शरीर जड पडते आणि ‘वॉर्म-अप’ करणेही कठीण जाते. सध्या मी नोकरीचा विचार करत नाहीये. पदक जिंकणे हेच माझे ध्येय आहे. मला खात्री आहे की, या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या ‘पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धां’मध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या ‘पॅरालिम्पिक्स’मध्ये मी आणखी चांगली कामगिरी करणार असल्याचं दिलीप गावितने म्हटलंय.

Exit mobile version