मोठी बातमी ! ‘मेड इन चायना’ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी ; भारताचा चीनला दणका

CCTV Camera - नवीन नियमानुसार स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन (STQC)फ्रेमवर्क अंतर्गत नवीन प्रमाणीकरण एक एप्रिलपासून सुरू होणार आहे.

Cctv Camera Ban Chiana

Cctv Camera Ban Chiana

India to ban Chinese CCTV : केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणामुळे चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या मेड इ चायना सीसीटीव्ही कॅमेरे आणि संबंधित हार्डवेअर विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रीवर निर्बंध एक एप्रिलपासून लागू होणार आहे. चीनमधील काही कंपन्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची विक्री भारतात करता येणार नाही. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रमाणिकरणासाठी (सर्टीफिकेटसाठी) नवीन नियम एक एप्रिलसाठी लागू होणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्यांची विक्रीसाठी आपला देश मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ वेगाने वाढत आहेत. Hikvision, TP-Link, Dahua CCTVs या दोन कंपन्यांच्या सीटीटीव्ही कॅमेऱ्यांची देशात जास्त विक्री होते. नवीन नियमानुसार स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन (STQC)फ्रेमवर्क अंतर्गत नवीन प्रमाणीकरण एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे देशात विकल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही उत्पादनांसाठी STQC मान्यता बंधनकारक आहे.

‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका वृत्तनुसार सीसीटीव्ही कॅमेरे संबंधित उत्पादने आणि ‘मेड इन चायना’ चिपसेटवर चालणारी कोणतीही उपकरणे बनवणाऱ्या चिनी कंपन्यांना अधिकारी आवश्यक प्रमाणीकरण देत नाहीत. प्रमाणीकरणाशिवाय चिनी कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपली उत्पादने विकू शकत नाहीत.
इंटरनेट-कनेक्टेड उपकरणांसाठी सुरक्षा मानके अधिक मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इंटरनेट कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गोपनीय माहिती दुसऱ्या देशात जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकते आहे.

नवीन नियमांनुसार, उत्पादकांना उत्पादनांच्या, विशेषतः सिस्टम-ऑन-चिपच्या उत्पदानाची मूळ देशाची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यांनी असुरक्षितता चाचणीसाठी (vulnerability testing) उपकरणे सादर करणे देखील आवश्यक आहे.

Exit mobile version