Download App

बिळात लपलेले शत्रू दिसणार! 97 फायटर जेट्स अन् 156 हेलिकॉप्टर्स खरेदीला मंजुरी

Mega Defense Deal : भारताची सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताला 97 तेजस फायटर विमानांसह(Fighter Jets) 156 हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे आता 156 फायटर हेलिकॉप्टरपैकी भारतीय लष्करासाठी 90 आणि हवाई दलासाठी 66 फायटर हेलिकॉप्टर असणार आहेत. डिफेन्स अॅक्वॅझिशन काऊन्सिल, संरक्षण अधिग्रहण परिषदेनं या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली असून फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्स दोन्ही स्वदेशी बनावटीचे आहेत. ही मेगा डील तब्बल 1.1 लाख कोटी रुपयांची आहे.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

सुत्रांच्या माहितीनूसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेने (डीएसी) भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 फायटर ताफ्यात प्रगती करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे. मेगा खरेदी प्रकल्प आणि सुखोई-30 अपग्रेड कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीवर 1.3 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. DAC च्या मंजूर प्रकल्पांचा तपशील संरक्षण मंत्रालय लवकरच देईल अशी अपेक्षा आहे.

पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय

एलसीए तेजसची पहिली आवृत्ती 2016 मध्ये हवाई दलात समाविष्ट करण्यात आली होती. सध्या, हवाई दलाचे दोन स्क्वॉड्रन (45 स्क्वॉड्रन आणि 18 स्क्वॉड्रन) एलसीए तेजसने पूर्णपणे सज्ज आहेत. स्वदेशी बनावटीच्या तेजसकडे येत्या काही वर्षांत हवाई दलातील सर्वात मोठा ताफा असणार आहे. भारतीय हवाई दलाने आधीच 83 LCA मार्क 1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली असून ज्याची किंमत सुमारे 36,468 कोटी रुपये आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये वितरण सुरू होणार आहे.

मुंब्र्यातील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत, सरकारी वरदहस्ताने…; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

डीलबाबत एकदा अंतिम किंमतीबाबत चर्चा झाल्यानंतर त्यावर कॅबिनेट समितीद्वारा हस्ताक्षर केले जातील. पण या डीलनंतर सैन्यात या विमानांचा प्रत्यक्ष समावेश व्हायला कमीत कमी १० वर्षे लागतील. सुखोई 30 एमकेआय या फायटर जेट्सच्या अपग्रेडसाठी देखील मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या हवाई दलाकडं २६० हून अधिक सुखोई ३० एमकेआय फायटर जेट्स आहेत. सुखोईचं अपग्रेडेशन हे स्वदेशी असण्याची शक्यता आहे.

तेजस एमके १ ए हलक्या स्वरुपातील फायटर विमान आहे. स्वदेशी बनावटीचं हे विमान फोर्थ जनरेशनचं फायटर विमान आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग केलेल रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, हवेतच इंधन भरण्याची क्षमता असे महत्वाचे फिचर्स आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) हे विमान बनवलं आहे. भारतानं बनवलेलं हे पहिलंच फायटर जेट आहे.

Tags

follow us