मुंब्र्यातील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत, सरकारी वरदहस्ताने…; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
Jitendra Awhad : ठाण्याच्या मुंब्रा येथील शिवसेना (Shiv Sena) शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. ही शाखा ताब्यात घेत शिंदे गटाने त्यावर बुलडोझर चालवला. आता त्या ठिकाणी मोठी वास्तू उभारली जात आहे. यावरून ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यांनी मुंब्रा येथील बेकायदा शाखेची पुर्नबांधणीच अनधिकृत असून सरकारी वरदहस्ताने हे कामे सुरू असल्याचा आऱोप केला.
मुंब्र्यातील बळकावलेल्या शाखेच्या पुनर्बांधणीच अनधिकृत काम हे सरकारी वरदहस्ताने किती जोरात सुरू आहे,याचा व्हिडिओ मी पुन्हा पोस्ट करत आहे.सदरील शाखा बळकावली,ती तोडली आणि त्यावर आता पुन्हा एकदा पुनर्बांधणी सुरू असल्याचे सर्व व्हिडिओ मी लागोपाठ पोस्ट करत आहे.
या सर्व प्रकरणाचा संबंध… pic.twitter.com/hCBVqK6E6a— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 29, 2023
दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे मुंब्रा येथे शिवसेनेची मध्यवर्ती शाखा सुरू केली होती. या शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी बसत होते. काही दिवसांपूर्वी या शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादामुळे शिंदे गटाचे अधिकारी राजन किणे यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसंच शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी येथे नवीन शाखा उभारण्यासाठी भूमिपूजनही केले होते. आता त्या ठिकाणी मोठी वास्तू उभारली जात आहे.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने लिन लैश्रामसोबत बांधली लग्नगाठ, पाहा फोटो
दरम्यान, शिंदे गटाकडून गुंडगिरी करत ही शाखा बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. तर या ठिकाणी शाखा नव्याने बांधायची असल्याने ती पाडण्यात आल्याचा दावा शिंदे गटाने केला. सध्या जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या जागी नवीन शाखा बांधण्यात येत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं. त्यातून त्यांनी जोरदार टीका केली.
आव्हाड यांनी लिहिलं की, मुंब्र्यातील बळकावलेल्या शाखेच्या पुनर्बांधणीचं अनधिकृत काम हे सरकारी वरदहस्ताने किती जोरात सुरू आहे, याचा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. सदरील शाखा बळकावली, ती तोडली आणि त्यावर आता पुन्हा एकदा पुर्नबांधणी सुरू असल्याचे सर्व व्हिडिओ मी लागोपाठ पोस्ट करत आहे. या सर्व प्रकरणाचा संबंध मुख्यत: पोलीस, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याशी येतो. परंतु हे तिन्ही महत्त्वाचे घटक आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी डोळे मिटून गप्प बसले आहेत, असं आव्हाड म्हणाले.
ठाण्यातील अन्य भागात हेच अधिकारी अनधिकृत बांधकामाला थांबवण्याच्या सूचना देताहेत. पाडण्याच्या सूचना देत असतात. जी चांगली गोष्ट आहे. परंतु, मुंब्र्यातील या शाखेबाबत जो काही गैरप्रकार सुरू आहे. त्याला मात्र हे अधिकारी का अभय देत आहेत? याचे कारण मला समजले नाही. आज मी दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहे. संबंधित अधिकारी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असं आव्हाड म्हणाले.