‘अस्तित्वाची चिंता म्हणूनच संघर्ष यात्रा..,’; चाकणकरांचा रोहित पवारांवर निशाणा

‘अस्तित्वाची चिंता म्हणूनच संघर्ष यात्रा..,’; चाकणकरांचा रोहित पवारांवर निशाणा

Rupali Chakankar On Rohi Pawar : काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरुन रुपाली चाकणकरांनी(Rupali Chakankar) निशाणा साधला आहे. स्वत:च्या अस्तित्वाची चिंता म्हणूनच संघर्षयात्रा काढत असल्याचं म्हणत रुपाली चाकणकर यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. कर्जतमधील खालापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत रुपाली चाकणकर बोलत होत्या.

चार राज्यात PM मोदींचा झंझावती प्रचार दौरा, मिझोराममध्ये एकही सभा का घेतली नाही?

चाकणकर म्हणाल्या,अजितदादांनी जो निर्णय घेतला तो राज्याच्या विकासासाठी घेतला आहे. मागील काही दिवसांपासून अजितदादा जे निर्णय घेताहेत त्याचं परिवर्तन आपल्यााला दिसत आहे. 18 पगड जातींचे लोकं सोबत घेऊन अजितदादांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. जनता दरबारातून जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे अजितदादांच्या आजारपणाचंही काही लोकांनी राजकारण केलं आहे.ज्यांना स्वत: च्या अस्तित्वाची चिंता ते आज संघर्षयात्रा काढत असल्याची टीका रुपाली चाकणकरांनी केली आहे.

Gold Price : लग्नसराईच्या सुरुवातीलाच वाढलं टेन्शन; सर्व विक्रम मोडत सोन्याला मिळाला उच्चांकी दर

तसेच काहींनी तर अजितदादा तुम्ही काय करता? हा प्रश्नही उपस्थित केला आहे. दिवा विचारतो जळणाऱ्या वातीला तू कुठे काय केलंस, अशी कविता म्हणत दादा तुम्ही काय करता असा प्रश्न विचारणाऱ्यांना रुपाली चाकणकरांनी सुनावलं आहे. तसेच दादा झिजत राहिले पण आज त्यांना विचारलं जात तुम्ही पक्षासाठी काय केलं. फक्त बोलणं नाहीतर ते करुन दाखवणारे अजितदादा असल्याचंही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

परिस्थितीनूसार निर्णय घ्यावा लागतो…
राज्यात सातत्याने राजकीय सभा होत आहेत. पण विधानसभा निवडणूक लवकर होईल, अशी शंका मनात ठेऊ नका लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं एकलं नाही. राज्यकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळं परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील घेतला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube