Download App

India VS Bharat : नरेंद्र मोदींच्या ओळखपत्रावर आले ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

  • Written By: Last Updated:

India VS Bharat : भारत या नावाची सध्या देशात चर्चा आहे. देशाचे ‘अधिकृत’ नाव बदलले जाईल की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु या बातमीला पुष्टी देणार्‍या गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता G20 कार्यक्रमाशी संबंधित नवीन ओळखपत्रे समोर आली आहेत. आता त्यावर Indian offical ऐवजी Bharat Official म्हणजे भारताचे अधिकारी असे लिहिले आहे.

एवढेच नाही तर ASEAN समिटशी संबंधित फंक्शन नोट्सवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान असे लिहिले आहे. यापूर्वी अशा फंक्शन नोट्सवर पीएम ऑफ इंडिया असे लिहिले होते. पंतप्रधान मोदी 7 सप्टेंबरला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाला जाणार आहेत.

India विरूद्ध भारत, देशाच्या नावावरून गदारोळ; काय आहे कलम- 1?

इंडिया विरुद्ध भारत वाद कसा सुरू झाला?
G-20 चे निमंत्रण पत्र मंगळवारी समोर आले. G-20 डिनरच्या या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिंडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले होते. यानंतर चर्चा रंगली.

काँग्रेस नेते जय राम रमेश यांनी ताबडतोब आमंत्रण पत्रकेवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सामान्यतः वापरले जाणारे ‘प्रेसिंडेंट ऑफ इंडिया’ बदलले गेले होते आणि ‘President Of Bharat’ वापरले गेले होते. म्हणजे इंडिया हा शब्द काढून टाकला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणावर दुहेरी भूमिका ? आधी विरोध आता थेट पाठिंबा

G-20 नंतर बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात देशाचे अधिकृत नाव बदलून इंडियावरु भारत असा प्रस्ताव आणला जाईल.

Tags

follow us