India विरूद्ध भारत, देशाच्या नावावरून गदारोळ; काय आहे कलम- 1?

India विरूद्ध भारत, देशाच्या नावावरून गदारोळ; काय आहे कलम- 1?

India VS Bharat : विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया (India) नाव दिले आणि त्यानंतर देशात देशाच्या इंडिया आणि भारत नावावरून गदारोळ सुरू झाला आहे. देशाचं नाव हे इंडिया नसून भारत आहे. असा प्रचार भाजपकडून केला जात आहे. त्यात आणखी भऱ पडली ती जी 20 बैठकीसाठी पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया नाही तर प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिण्यात आला असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. मात्र देशाच्या नावाचा नेमका विषय काय? या नावांशी संविधानातील कलम 1 चा नेमका संबंध काय आहे? जाणून घेऊ आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून…

खासदार इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणावर दुहेरी भूमिका ? आधी विरोध आता थेट पाठिंबा

भारतीय संविधानातील कलम काय आहे?

भारतीय संविधानाचं कलम 1 मध्ये म्हटलं आहे की, भारत हा राज्यांचा संघ असेल तर भारत आणि इंडिया हे एकच आहे. इंग्रजीमध्ये इंडिया (India) तर हिंदीमध्ये भारत म्हटलं जातं. हे गरजेनुसार वापरलं जाईल. असं नाही की इंडियाचं म्हटलं जावं किंवा भारतच म्हणावं असं ही काही नाही. भाषा आणि संदर्भानुसार देशाची ही नावं पावरली जातात असं तज्ज्ञ सांगतात.

भारताच्या वर्ल्डकप संघात दोन सर्वात मोठ्या कमजोरी, ‘या’ त्रुटींवर अनेकांनी बोट ठेवले

त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो विरोधकांनी उपस्थित केलेल्या जी 20 बैठकीच्या निमंत्रण पत्रामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया (India) ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिण्यात आला मुद्द्याचा ते चुकीचं आहे की, बरोबर. तर संविधानाच्या वर सांगितलेल्या कलम 1 नुसार प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हे चुकीचं ठरवता येणार नाही. कारण भारत किंवा इंडिया दोन्ही वापरलं जाऊ शकतं.

तर संविधानात इंडिया (India) या शब्दाला एवढं महत्त्व का मिळालं. पाहूयात तज्ज्ञ सांगतात की, भारतातील कायदेशीरबाबी आणि संविधान देखील ब्रिटीश काळातील आहे. संविधानात देखील अनेक कलमं हे ब्रिटीश शासनाच्या काळातील आहेत. तर इंग्रजांनी भारताचं नाव इंडिया हे वापरलं आहे. त्यामुळे संविधानामध्ये देखील ते स्वीकारण्यात आलं. तर त्यानंतर प्रशासन व्यवस्था आणि न्याय पालिकेमध्ये इंडिया हाच शब्द रूढ झाला. त्यानंतर राजकीय पक्षांनी आताचं नाही तर अनेकदा इंडिया या नावावर आक्षेप घेतला. ते बदलन्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलं आहे. मात्र ते झालं नाही.

इंडिया ऐवजी भारत नाव वापरण्यात काय अडचणी?

याबद्दल देखील तज्ज्ञ सांगतात की, जर देशाचं इंडिया (India) नाव काढून त्या ऐवजी केवळ भारत हे नाव वापरण्याचा निर्णय घेतला गेला तर अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. त्यात देशाच्या कायद्यांपासून संविधानिक संस्थांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये इंडिया शब्द वापरण्यात आला आहे. तो देखील बदलावा लागेल. ही प्रक्रीया खूप किचकट आणि मोठी आहे. ती करण्यासाठी प्रचंड मोठा काळ लागेल. त्याचबरोबर त्यामुळ अनेक अचडचणी देखील निर्माण होऊ शकतात. जसं की, सरकारला सर्व कागद पत्रांमध्ये बदल करावे लागतील. त्यासाठी संविधानात बदल करावे लागणार आहेत. ते विधेयक संसदेत पारित व्हावं लागेलं. त्यानंतर हे शक्य आहे. त्यामुळे इंडिया किंवा भारत शब्दांच्या वापराला संविधानिक आधार आहे. त्यामुळे इंडिया ऐवजी भारत आणि भारता ऐवजी इंडिया कोणताही शब्द चुकीचा नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube