Download App

बंगळुरूच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव बदलले; ‘यूपीए’च्या ऐवजी ‘इंडिया’

Opposition alliance : बेंगळुरूमध्ये देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे.

बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी नावावर चर्चा केल्याचे समजते. यूपीएऐवजी विरोधी पक्षांची नवीन ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी’ (I-N-D-I-A) बनवण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. 2024 च्या लढाईत सत्ताधारी भाजपशी लढण्यासाठी हे नाव प्रभावी ठरेल आणि लोकांनाही ते आवडेल, असा विश्वास विरोधी आघाडीच्या नेत्यांना आहे. सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी विरोधी पक्षांचे बंगळुरूमध्ये मंथन सुरु आहे.

दरम्यान, बंगळुरूमधील बैठकीचा पहिला दिवस अनौपचारिक होता, त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. बैठकीत महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली आहे. कालच्या भोजन सभेतच सर्व राजकीय पक्षांना नावे सुचविण्यास सांगण्यात आले असून मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा करून एकमत केले जाईल, असे सांगण्यात आले. आघाडीच्या नेत्यांनी यूपीएचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला होता.

Janhvi Kapoor: कोण आहे जान्हवीचा बॉयफ्रेंड? जाणून घ्या मिस्ट्री बॉय अन् सोलापूरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातवाबद्दल…

यूपीएच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजक बनवले जाणार आहे. सोनिया गांधी यांनी 2004 ते 2014 या काळात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा म्हणून काम पाहिले. याव्यतिरिक्त, दोन उपसमित्यांची स्थापना केली जाईल: एक समान किमान कार्यक्रम आणि संवादाचे मुद्दे अंतिम करण्यासाठी आणि दुसरी संयुक्त कार्यक्रम, रॅली आणि परिषदांची योजना करण्यासाठी असणार आहे.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

सोनिया गांधींव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद, शरद पवार, उद्धव ठाकरे हे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले आहेत.

Tags

follow us