Pahalgaon Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. (Attack) गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आहे. भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं असल्याचं वृत्त आहे. सहा दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात आलं आहे. काश्मीरमधील जंगलात लपलेल्या या हल्लेखोर दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरलं आहे. त्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. परंतु, ही चकमक नेमकी कुठं सुरु आहे, त्याबाबत अजून माहिती मिळाली नाही. पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.
पहलगाम हल्ल्यातील दहशवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पोहचले नाही. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. मंगळवारी ते दहशतवादी काश्मीरच्या जंगलांमध्ये सापडले. त्यानंतर सर्व सहा दशतवाद्यांना लष्कराने घेरले आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे दहशतवाद्यांना वाहन वापरणे शक्य नव्हते. यामुळे हे दहशतवादी चालतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जात होते.
लष्कराला मिळालेल्या माहितीनंतर सर्व दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले आहे. घटनास्थळी गोळीबार सुरु आहे. या दहशतवाद्यांकडे शस्त्रे असल्यामुळे त्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा २४ तास काम करत होती. सर्वत्र कोबिंग ऑपरेशन सुरु होते. एनआयएकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. संशयितांची घरे पाडली जात होती. पहलगावपासून काही अंतरावरच हे दहशतवादी सापडले आहे. त्यांच्याकडे चीनी बनावटीचे एक सॅटेलाइट फोन असल्याचे सांगितले जात होते. सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कारातील जवानांनी त्यांना घेरले आहे.